News Flash

Mumbai Building Collapse: मुंबईत रहिवासी इमारत कोसळून ११ जणांचा मृत्यू; सात जखमी

मालाडमध्ये इमारत शेजारील घरांवर कोसळून मोठी दुर्घटना, बचावकार्य सुरु

मालाडमध्ये इमारत शेजारील घरांवर कोसळून मोठी दुर्घटना

मुंबईच्या मालाडमध्ये रहिवासी इमारत कोसळून ११ जणांचा मृत्यू झाला आहे. मालाड पश्चिमेला असणाऱ्या न्यू कलेक्टर कंपाऊंड येथे ही दुर्घटना घडली आहे. चारमजली इमारत शेजारच्या घरांवर कोसळली असल्याची माहिती मिळाली असून यानंतर आसपासच्या इमारतींमधील रहिवाशांना सुरक्षितस्थळी हलवण्यात आलं आहे. घटनास्थळी बचावकार्य सुरु असल्याची माहिती पालिकेच्या अधिकाऱ्यांनी दिली असून मृतांच्या संख्या वाढण्याची भीती आहे.

ढिगाऱ्याखाली काहीजण दबले असल्याची भीती

मुंबईत बुधवारी पावसाने जोरदार हजेरी लावल्याने जनजीवन विस्कळीत झालं असतानाच मालाडच्या मालवणीमध्ये रात्रीच्या सुमारास ही इमारत कोसळली. इमारत शेजारी असणाऱ्या घरांवर कोसळली असून अग्निशमन दलाकडून घटनास्थळी बचावकार्य सुरु आहे. या दुर्घटनेत ११ जणांचा मृत्यू झाला असून सात जण गंभीर जखमी झाले असल्याची माहिती पालिकेच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे. ढिगाऱ्याखाली काहीजण दबले असल्याची भीती असून मृतांची संख्या वाढण्याची भीती आहे.

घटनेची माहिती मिळाल्यानंतर पालकमंत्री अस्लम शेख घटनास्थळी पोहोचले होते. यावेळी त्यांनी मुसळधार पावसामुळे इमारत कोसळल्याची माहिती दिली.

स्थानिकांच्या मदतीने बचावकार्य करत जखमींना कांदिवलीमधील रुग्णालयात नेण्यात आलं होतं. डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार, “१७ जखमींना आणण्यात आलं होतं. यामधील नऊ जणांचा मृत्यू झाला होता. इतर आठ जणांवर उपचार सुरु होते”.

पालिकेच्या अधिकाऱ्यांना सांगितल्यानुसार, रात्री ११ वाजून १० मिनिटांनी ही दुर्घटना घडली. पोलीस आणि अग्निशमन दलाचे अधिकारी घटनास्थळी असून बचावकार्य सुरु आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 10, 2021 7:06 am

Web Title: mumbai building collapse malad west new collector compound sgy 87
Next Stories
1 ‘हिंदमाता’पुढे पालिकेने गुडघे टेकले!
2 ‘जल’वाहतूक!
3 रुग्णसेवेवर पावसाचा विशेष परिणाम नाही
Just Now!
X