News Flash

उद्वाहनाच्या अपघातात व्यावसायिकाचा मृत्यू

दातांच्या उपचारासाठी वरळी येथील ‘बिना इस्टा’ या इमारतीत ते आले होते

प्रतिनिधिक छायाचित्र

मुंबई : उद्वाहनाच्या (लिफ्ट) अपघातात वरळी भागात एका व्यावसायिकाचा रविवारी सायंकाळी मृत्यू झाला. विशाल मेवानी (४६) असे या व्यावसायिकाचे नाव आहे. कोहिनूर या साखळी इलेक्ट्रॉनिक दुकानांचे ते मालक होते.

मेवानी हे जसलोक रुग्णालयाजवळ राहत. दातांच्या उपचारासाठी वरळी येथील ‘बिना इस्टा’ या इमारतीत ते आले होते. त्यांचा मित्र या इमारतीत राहतो. त्याच्या घरी डॉक्टर येणार असल्याने तपासणीसाठी म्हणून ते येथे आले होते. या वेळी इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावर राहणाऱ्या मित्राच्या घरी जाण्यासाठी त्यांनी उद्वाहनाचे बटण दाबले. उद्वाहन तळमजल्यावर येण्याआधीच त्यांनी दरवाजा उघडला आणि ते आतमध्ये शिरले. मात्र उद्वाहन दुसऱ्या मजल्यावर असून आपण आधीच दरवाजा उघडून आत प्रवेश केला असल्याचे लक्षात येताच त्यांनी दरवाजा उघडून बाहेर पडण्याचा प्रयत्न केला. मात्र तोपर्यंत दरवाजा बंद झाला होता. तसेच उद्वाहन तळमजल्यावर येत होते. मेवानी यांनी आवाज देण्याचा प्रयत्न केला. मात्र तोपर्यंत हे उद्वाहनाखाली दबले गेले होते. यात ते गंभीर जखमी झाले. इमारतीतील सुरक्षारक्षक आणि रहिवासी गोळा झाले. त्यांना तात्काळ ब्रीच कॅ ण्डी रुग्णालयात दाखल केले. मात्र थोडय़ाच वेळात त्यांचा मृत्यू झाला, अशी माहिती वरळी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक सुखलाल वरपे यांनी दिली. याप्रकरणी पोलिसांनी अपघाती मृत्यूची नोंद केली आहे. पुढील तपास वरळी पोलीस करत आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 8, 2020 12:05 am

Web Title: mumbai businessman dies in lift accident at worli zws 70
Next Stories
1 पर्यटन कंपन्यांकडून ‘वर्केशन’ पॅकेज
2 ड्रग प्रकरणी NCB ने कंगनाची स्वतःहून चौकशी करावी – सचिन सावंत
3 चंदा कोचर यांचे पती दीपक कोचर यांना अटक, ईडीची कारवाई
Just Now!
X