News Flash

मुंबईतील व्यवसायिकाला ३.३ कोटींचा गंडा, बनावट आधार आणि सीम कार्डच्या सहाय्याने फसवणूक

एका अनधिकृत सीम कार्डच्या आधारे आरोपीने व्यवसायिकाच्या बँक खात्यात प्रवेश मिळवला

मुंबईतील एका व्यवसायिकाची फसवणूक करण्यात आली असून ३.३ कोटींचा गंडा घालण्यात आल्याचं समोर आलं आहे. व्यवसायिकाच्या आधार कार्डच्या बनावट प्रतच्या आधारे त्याच्या खात्यातून हे पैसे काढण्यात आले. आरोपी गोवंडीचा रहिवासी असून अमनतुल्लाह शेख असं त्याचं नाव आहे. एका अनधिकृत सीम कार्डच्या आधारे आरोपीने व्यवसायिकाच्या बँक खात्यात प्रवेश मिळवला. यामुळे व्यवहार करताना ओटीपी आरोपीने ओटीपी मिळवले आणि भली मोठी रक्कम काढून घेतली.

व्यवसायिकाच्या खात्यातून ७ ते ९ जुलै दरम्यान हे व्यवहार करण्यात आले. १२ जुलै रोजी व्यवसायिकाने सायबर सेलशी संपर्क साधत तक्रार दाखल केली. पीडित व्यवसायिक शाळा पुस्तकांचा प्रकाशक आहे. आरोपी शेख हा व्यवसायिकाच्या खासगी माहितीवर नेहमी लक्ष ठेवून असे. त्याला व्यवसायिकाचा मोबाइल नंबर माहिती होता. इतकंच नाही तर व्यवसायिकाची खासगी कागदपत्रंही त्याच्याकडे होती.

कशा पद्दतीने केली फसवणूक
सर्वात प्रथम आऱोपी शेखने मोबाइल सेवा पुरवणाऱ्या कंपनीशी व्यवसायिक असल्याचं भासवत संपर्क साधला. व्यवसायिक वापरत असलेला मोबाइल क्रमांक आपल्याला मिळावा यासाठी त्याने ही शक्कल लढवली. शेख याने कंपनीला मोबाइल हरवला असल्याचं सांगत हा नंबर ब्लॉक करुन नवं सीम देण्यासाठी विनंती केली. बांधकाम कंत्राटदार असणाऱ्या आरोपी शेखने यानंतर व्यवहार करत ओटीपी मिळवले आणि व्यवसायिकाला गंडा घातला.

यामागे अजून कोण ?
आरोपी शेख याला मुंबई सायबर पोलिसांनी शनिवारी अटक केली. सध्या पोलीस आरोपी शेखला व्यवसायिकाची खासगी कागदपत्रं तसंच त्याच्या बँक खात्याची माहिती कशी मिळाली याची चौकशी करत आहे. याप्रकरणी अनेकजण संशयित आहेत. यामागे शेख एकटा आरोपी नसणार असा पोलिसांचा दावा आहे.

“एखाद्याच्या बँक खात्याची माहिती तसंच ओळखपत्र इतक्या सहजासहजी मिळवणं कोणासाठीही सोपं नाही. शेखची अटक ही आमच्या तपासाची फक्त सुरुवात आहे”, असं पोलीस अधिकाऱ्याने सांगितलं आहे. दरम्यान पोलिसांनी दिलेल्या माहिनुसार, “शेख याने ३.३ कोटींची चोरी केली असून यामधील २५ लाख त्याने स्वत:च्या बँक खात्यात वळते केले. दीड लाख रुपयांचं त्याने सोनं खरेदी केलं. तसंच चार लाख इतर खरेदीसाठी वापरले”.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 15, 2019 1:19 pm

Web Title: mumbai businessman dupes for 3 3 crore illegel aadhar sim card sgy 87
Next Stories
1 महाराष्ट्र काँग्रेसला प्रदेशाध्यक्ष मिळाला पण नेतृत्वासाठी पक्ष उरलाय?-शिवसेना
2 मुंबई: नायर रुग्णालयातील तीन डॉक्टरांना जमावाकडून मारहाण
3 धारावी प्रकल्पासाठी फेरनिविदा!
Just Now!
X