16 September 2019

News Flash

धक्कादायक! मुंबईत व्यावसायिकाने महिला कर्मचाऱ्यावर बलात्कार करुन सोडलं वेश्यागृहात

माजी महिला कर्मचाऱ्यावर बलात्कार केल्या प्रकरणी नागापाडा पोलिसांनी पाच सप्टेंबरला गोरेगावमधून एका २७ वर्षीय व्यावसायिकाला अटक केली.

(सांकेतिक छायाचित्र)

माजी महिला कर्मचाऱ्यावर बलात्कार केल्या प्रकरणी नागापाडा पोलिसांनी पाच सप्टेंबरला गोरेगावमधून एका २७ वर्षीय व्यावसायिकाला अटक केली. महिलेला ड्रग्स दिल्याचा तसेच बलात्कारानंतर तिला वेश्यागृहात सोडून दिल्याचा व्यावसायिकावर आरोप आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपी गोरेगाव पश्चिमेला रहाणारा असून त्याचा केटरींगचा व्यवसाय आहे. पीडित महिला आरोपीकडे नोकरी करायची. हिंदुस्थान टाइम्सने हे वृत्त दिले आहे.

अलीकडेच तिने राजीनामा दिला होता. आपले थकलेले पैसे देण्याची तिने आरोपीला विनंती केल्यानंतर तो तयार झाला. आरोपीने महिलेला दोन सप्टेंबरला अंधेरी मेट्रो स्टेशन येथे बोलावले. आरोपीने सांगितलेल्या ठिकाणी महिला पोहोचल्यानंतर त्याने तिच्यासमोर बीचवर जाण्याचा प्रस्ताव ठेवला.

त्यानंतर आरोपीने महिलेला मद्य दिले. मद्यप्राशन केल्यानंतर तिला गरगरल्यासारखे होऊ लागले. आरोपी तिला नागापाडा येथील एका रुममध्ये घेऊन गेला. पीडित महिला नशेमध्ये असताना आरोपीने तिच्यावर बलात्कार केला अशी माहिती पोलीस अधिकाऱ्याने दिली. दुसऱ्या दिवशी सकाळी तिचे डोळे उघडले तेव्हा पीडित महिला कामाठीपुरा येथील एका वेश्यागृहामध्ये होती. तिथून कशीबशी स्वत:ची सुटका करुन घेतल्यानंतर तिने थेट नागापाडा पोलीस स्टेशन गाठले व आरोपी विरोधात तक्रार नोंदवली. पोलिसांनी ५ सप्टेंबरला आरोपीला त्याच्या घरातून अटक केली.

 

First Published on September 11, 2019 1:29 pm

Web Title: mumbai businessman ex staffer rapes her dmp 82