लैंगिक शक्ती वाढवणारी औषधे विकणाऱ्या अंधेरीतील एका कॉल सेंटरचा गुन्हे शाखेच्या पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. या कॉल सेंटरमधून अमेरिकन नागरिकांना बेकायदारित्या लैंगिक शक्ती वाढवणाऱ्या औषधांची सर्रास विक्री सुरु होती. अंधेरी पूर्वेला मरोलमध्ये हे कॉल सेंटर होते. एएमएम कॉल कनेक्ट असे या कॉल सेंटरचे नाव होते. या कॉल सेंटरचा मालक मुद्दस्सर हारुन माकांदर (३४) आणि त्याचा उजवा हात अ‍ॅशली ग्लेन डिसुझा (३८) या दोघांना अटक करण्यात आली आहे. टाइम्स ऑफ इंडियाने हे वृत्त दिले आहे.

कॉल सेंटरमध्ये किती लोक काम करायचे?
कॉल सेंटरमध्ये २२ पेक्षा जास्त लोक काम करत होते. त्या सर्वांना ताब्यात घेण्यात आले होते. पोलिसांनी घटनास्थळावरुन कॉम्प्युटर, मोबाइल फोन आणि अमेरिकन क्लायंटसचे नंबर असलेले डाटा कार्ड जप्त केले आहेत. डाटा कार्डमध्ये अमेरिकन कॉन्टॅक्टसचेही नंबर होते, ज्यावरुन या वस्तुंची विक्री व्हायची. माहिती तंत्रज्ञान कायद्याच्या कलमांखाली आरोपींना अटक करण्यात आली आहे.

Iran Israel conflict wrong us policy worsening the west asia situation
अन्वयार्थ : अमेरिकेच्या चुकांची परिणती
Pune model of co-working space From start-ups to large companies everyone is getting preference
को- वर्किंग स्पेसचे पुणेरी मॉडेल! स्टार्टअपपासून मोठ्या कंपन्यांपर्यंत सर्वांचीच मिळतेय पसंती
ExlService Holdings
अमेरिकन आयटी कंपनीनं भारत व यूएसमधील ८०० कर्मचाऱ्यांची केली कपात; आता AI तज्ज्ञांची होतेय भरती!
Apple Company has decided to fires 600 employees in California
‘ॲपल’कडून ६०० कर्मचाऱ्यांना नारळ; कंपनीकडून करोनानंतरची पहिलीच मोठी कर्मचारी कपात

कामकाजाची काय पद्धत होती ?
गुन्हे शाखेच्या युनिट दहाचे पोलीस निरीक्षक सुनील माने यांच्या नेतृत्वाखाली ही छापेमारीची कारवाई करण्यात आली. “जेव्हा आम्ही आतमध्ये प्रवेश केला, त्यावेळी कॉल सेंटरचे कर्मचारी अमेरिकन्सच्या इंग्रजी बोलण्याच्या शैलीमध्ये अमेरिकन नागरिकांच्या प्रश्नांना उत्तरे देत होते. दिशाभूल करण्यासाठी जेम्स, जॉन, हॅरी अशी नावे त्यांनी धारण केली होती. लैंगिक शक्ती वाढवणाऱ्या उत्पादनांची ते विक्री करत होते” असे माने यांनी सांगितले.

कर्मचाऱ्यांची जबानी नोंदवल्यानंतर त्यांना सोडून देण्यात आले. त्यांना या प्रकरणात साक्षीदार बनवण्यात येईल. आरोपींनी आपल्या कर्मचाऱ्यांना अस्खलित अमेरिकन शैलीत इंग्रजी बोलण्याचे प्रशिक्षण दिले होते. त्यांच्याकडे एक तयार केलेली स्क्रिप्ट होती. पोलीस मुद्दस्सर हारुन माकांदर आणि अ‍ॅशली ग्लेन डिसुझाची कसून चौकशी करत आहेत. यापूर्वी त्यांचा अशा कुठल्या रॅकटशी संबंध होता का? ते सुद्धा तपासून पाहिले जात आहे. आरोपींना डॉलर्समध्य़े पैसे मिळत होते, थेट त्यांच्या खात्यामध्ये ही रक्कम जमा व्हायची असे पोलिसांनी सांगितले.