गेल्या काही दिवसांपासून लोकल गाडय़ांचे वेळापत्रक धुक्यामुळे विस्कळीत होत आहे. त्यामुळे मध्य रेल्वेने खोपोली, कर्जत आणि कसाराहून पहाटेच्या वेळेत सुटणाऱ्या लोकल गाडय़ांच्या वेळापत्रकात बदल करण्याचा निर्णय घेतला आहे. या लोकल दहा ते पंधरा मिनिटे लवकर सोडण्यात येणार असून त्यामुळे प्रवाशांना लोकल पकडण्यासाठी स्थानकातही आधीच पोहोचावे लागेल. महत्त्वाची बाब म्हणजे धुक्यामुळे लोकल गाडय़ांच्या वेळेत बदल करण्याची ही पहिलीच वेळ असल्याचे मध्य रेल्वेकडून सांगण्यात आले. खोपोली, कर्जत, कसारा ते कल्याणपर्यंत मोठय़ा प्रमाणात धुके असते. त्यामुळे येथून सीएसएमटीच्या दिशेने जाणाऱ्या लोकल गाडय़ा उशिराने धावतात.

दरम्यान, गुरुवारी रात्री मध्य रेल्वे विस्कळीत झाल्याने कामावरून परतणाऱ्या नोकरवर्गाला मोठा फटका बसला.

कर्जत ते सीएसएमटी लोकलच्या नवीन वेळा

लोकल  सुटणार

कर्जत ते सीएसएमटी     मध्यरात्री २.२५ वा.

कर्जत ते सीएसएमटी     पहाटे ३.३१ वा.

अंबरनाथ ते सीएसएमटी  पहाटे ५.१२ वा.

कर्जत ते सीएसएमटी     पहाटे ४.२७ वा.

कर्जत ते सीएसएमटी     पहाटे ४.३९ वा.

खोपोली ते सीएसएमटी   पहाटे ४.४० वा.

कर्जत ते सीएसएमटी     पहाटे ५.४५ वा.

कसारा ते सीएसएमटी लोकलच्या नवीन वेळा

लोकल  सुटणार

कसारा ते सीएसएमटी    पहाटे ४.१० वा.

कसारा ते सीएसएमटी    पहाटे ४.४५ वा.

कसारा ते सीएसएमटी    पहाटे. ५.५५ वा.

कसारा ते सीएसएमटी    सकाळी ६.३५ वा.