19 January 2018

News Flash

मुंबई चालिसा!

रणजी करंडक क्रिकेट स्पध्रेवरील आपले अबाधित वर्चस्व मुंबईच्या संघाने ‘मुंबई चालिसा’ हा ऐतिहासिक सुवर्णाध्याय लिहून साजरे केले. ‘मुंबै, मुंबै..’ हा अविरत नारा वानखेडे स्टेडियमवर क्रिकेटरसिकांचा

प्रशांत केणी, मुंबई | Updated: January 29, 2013 3:09 AM

रणजी करंडक क्रिकेट स्पध्रेवरील आपले अबाधित वर्चस्व मुंबईच्या संघाने ‘मुंबई चालिसा’ हा ऐतिहासिक सुवर्णाध्याय लिहून साजरे केले. ‘मुंबै, मुंबै..’ हा अविरत नारा वानखेडे स्टेडियमवर क्रिकेटरसिकांचा सुरू होता. त्यांच्याच साक्षीने मुंबई संघाने सौराष्ट्रचा एक डाव आणि १२५ धावांनी पराभव केला आणि विजेतेपदाच्या जल्लोषाला झोकात प्रारंभ केला.
मुंबईने अजित आगरकर व धवल कुलकर्णी यांच्या वेगवान माऱ्याच्या बळावर सौराष्ट्रचा दुसरा डाव फक्त ८२ धावांवर गुंडाळला आणि तिसऱ्या दिवशीच रणजी करंडकावर शिक्कामोर्तब केले. ‘जीत जायेंगे हम तू अगर संग है..’ ही ऊर्जा निर्माण करणारा सचिन तेंडुलकर आणि मुंबईकर क्रिकेटरसिकांच्या साक्षीने आगरकरने राष्ट्रीय क्रिकेटवरील मुंबईचा ठसा उमटविणारा चषक उंचावला. त्यानंतर मुंबईच्या ड्रेसिंगरूममध्ये मुंबईचे खेळाडू आणि पदाधिकाऱ्यांनी एक अनोखा जश्न साजरा केला. मुंबईला रणजी विजेतेपदाचे दोन कोटी बक्षीस मिळाले. याचप्रमाणे मुंबई क्रिकेट असोसिएशनकडून रणजी विजेत्या मुंबईच्या खेळाडूंना तीन कोटी रुपयांचे इनाम जाहीर करण्यात आले.     

जल्लोष आणि पाच कोटी
‘जीत जायेंगे हम तू अगर संग है..’ ही ऊर्जा निर्माण करणारा सचिन तेंडुलकर आणि मुंबईकर क्रिकेटरसिकांच्या साक्षीने आगरकरने राष्ट्रीय क्रिकेटवरील मुंबईचा ठसा उमटविणारा चषक उंचावला. त्यानंतर मुंबईच्या ड्रेसिंगरूममध्ये मुंबईचे खेळाडू आणि पदाधिकाऱ्यांनी जल्लोष साजरा केला. मुंबईला रणजी विजेतेपदाचे दोन कोटी बक्षीस मिळाले. याचप्रमाणे मुंबई क्रिकेट असोसिएशनकडून रणजी विजेत्या मुंबईच्या खेळाडूंना तीन कोटी रुपयांचे इनाम जाहीर करण्यात आले.

First Published on January 29, 2013 3:09 am

Web Title: mumbai chalisa
  1. No Comments.