आतापर्यंत तीनवेळा विजय हजारे करंडकचे जेतेपद खात्यावर असणारा मुंबईचा संघ चौथ्या अजिंक्यपदासाठी उत्सुक होताच. २०१८-१९ मध्ये त्यांनी अखेरचे जेतेपद पटकावले होते. उत्तर प्रदेशचा संघ तिसऱ्यांदा स्पर्धेच्या अंतिम फेरीत खेळत होता.

मुंबईने ३१३ धावांचे लक्ष ४१.३ षटकांमध्ये ४ गड्यांच्या मोबदल्यात पूर्ण केले आणि अंतिम सामन्यात उत्तर प्रदेशला नमवून विजय हजारे करंडकावर चौथ्यांदा आपले नाव कोरले. रविवारी खेळल्या गेलेल्या अंतिम सामन्यात सलामीचा फलंदाज माधव कौशिक याच्या नाबाद १५८ धावांच्या जोरावर उत्तर प्रदेशने मुंबईला ३१२ धावांचे आव्हान दिले होते.

१५६ चेंडूत १५ चौकार आणि चार षटकारांच्या मदतीने कौशिकने आणि समर्थ सिंह (५५ धावा ७३ चेंडू) यांनी पहिल्या विकेटसाठी १२२ धावांची भागीदारी करुन मोठ्या धावसंख्येचा पाया रचला.

२४ व्या षटकात पहिल्या स्लिपमध्ये क्षेत्ररक्षण करताना डाव्या पायाला दुखापत झाल्यामुळे पृथ्वी शॉ मैदानातून निघून जावे लागले होते, परंतु उपचारानंतर तो मैदानात परतला .

मुंबईच्या फिरकी गोलंदाजांनी झटपट दोन बळी मिळवून उत्तर प्रदेशला बॅक फूट वर आणले. लेगस्पिनर प्रशांत सोलंकीने (१/७१) समर्थला बाद केले.

ऑफस्पिनर तनुष कोटियानने (२/५४) कर्ण शर्मा (०) यांला बाद केले. त्यावेळी उत्तर प्रदेशची धावसंख्या १२३ वर २ अशी झाली.

कौशिकने आपले फटकेबाजी चालूच ठेवली आणि मुंबईच्या हल्ल्याला फळ येवू दिले नाही. अक्षदीप नाथने (५५ धावा, ४ चौकार आणि ३ षटकार) आपली भूमिका पार पाडली.

उत्तर प्रदेशची स्थिती ४३ षटकात ३ गड्यांच्या मोबदल्यात २३७ अशी होती. कौशिक आणि नाथ यांनी चौथ्या विकेटसाठी १२8 धावांची भागीदारी केली त्यामुळेच उत्तर प्रदेशला ३०० चा टप्पा ओलांडता आला. त्यांनी अखेरच्या १० षटकांत १११ धावा केल्या.