24 February 2021

News Flash

मुंबईच्या पोलीस आयुक्तपदी कोण?

बर्वे यांना मुदतवाढ दिली जाणार नसल्याचे राज्य सरकारने शुक्रवारी स्पष्ट केले.

संजय बर्वे

आयुक्त संजय बर्वे आज निवृत्त

मुंबई : मुंबईचे पोलीस आयुक्त संजय बर्वे आज, शनिवारी सेवानिवृत्त होत असल्याने त्यांच्याजागी कोणत्या अधिकाऱ्याची वर्णी लागते, मुंबई पोलीस आयुक्तपदी नियुक्त होणारा अधिकारी महासंचालक दर्जाचा असेल की अतिरिक्त महासंचालक दर्जाचा असेल, याबाबत उत्सुकता आहे.

बर्वे यांना मुदतवाढ दिली जाणार नसल्याचे राज्य सरकारने शुक्रवारी स्पष्ट केले. पाठोपाठ नायगाव पोलीस मुख्यालयात बर्वे यांच्या निरोप समारंभाची तयारीही सुरू करण्यात आली. त्यामुळे मुंबई पोलीस आयुक्तपदाची धुरा नव्या अधिकाऱ्याकडे सोपवली जाणार, हे निश्चित झाले. मात्र रात्री उशिरापर्यंत नव्या आयुक्ताच्या निवडीची घोषणा न झाल्याने उत्सुकता वाढली आहे.

गेल्या काही दिवसांपासून आयुक्तपदाच्या निवडीवरून तर्कवितर्काना उधाण आले होते. अधिकाऱ्याच्या सेवाज्येष्ठतेसोबत त्याचे कार्य, राजकीय जवळीक आदी बाबींवरून अंदाज लावले जात होते. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे महासंचालक परमबीर सिंग यांच्यासह अतिरिक्त महासंचालक (कायदा व सुव्यवस्था) रजनीश सेठ, केंद्रातील प्रतिनियुक्तीवरून अलीकडेच महाराष्ट्रात परतलेले सदानंद दाते, पुण्याचे पोलीस आयुक्त डॉ. के. वेंकटेशम आदी अधिकाऱ्यांची नावे चर्चेत होती. युती सरकारने मुंबई पोलीस आयुक्तपद उन्नत करून त्यास महासंचालकाचा दर्जा दिला. आता महाविकास आघाडी सरकार पोलीस आयुक्तपदाचा दर्जा कायम ठेवते की पुन्हा अतिरिक्त महासंचालक दर्जाच्या अधिकाऱ्याकडे आयुक्तपदाची धुरा सोपवते, याकडे लक्ष लागले आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 29, 2020 3:49 am

Web Title: mumbai commissioner sanjay barve retired today zws 70
Next Stories
1 ट्रेलरची धडक बसून किंग्ज सर्कलजवळील रेल्वे पुलाचा भाग निखळला
2 सरकारविरोधी टीकात्मक घोषणा देशद्रोह नाही!
3 जातनिहाय जनगणनेचा विधिमंडळाचा ठराव फेटाळला
Just Now!
X