News Flash

भोईवाडा न्यायालयात फिर्यादीचा आरोपींवर चाकूहल्ला

कोर्टातील सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर

प्रातिनिधिक छायाचित्र

मुंबईतील भोईवाडा न्यायालयात फिर्यादीने आरोपींवरच चाकूहल्ला केल्याची घटना घडली. कोर्ट रुममध्येच ही धक्कादायक घटना घडली असून पोलिसांनी हल्लेखोराला ताब्यात घेतले आहे.

मारहाणप्रकरणी अटक केलेल्या तीन तरुणांना बुधवारी भोईवाडा कोर्टात हजर करण्यात आले होते. न्यायाधीशांनी आरोपींना जामीन मंजूर करताच फिर्यादीने खिशातून चाकू बाहेर काढला आणि कोर्ट रुममध्येच आरोपींवर हल्ला केल्याचे वृत्त ‘एबीपी माझा’ या वृत्तवाहिनीने दिले आहे. या घटनेने काही काळ गोंधळाची स्थिती निर्माण झाली. मात्र पोलिसांनी वेळीच हल्लेखोराला रोखले आणि परिस्थितीवर नियंत्रण मिळवले. या हल्ल्यात तीन पैकी दोन आरोपी जखमी झाले असून त्यांना केईएम रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दरम्यान, या घटनेने कोर्टातील सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 22, 2017 3:17 pm

Web Title: mumbai complainant knife attack on accused in bhoiwada court two injured
Next Stories
1 शिक्षण विभागाचे सर्व ‘शिक्षा’ अभियान!
2 शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी एकत्र?
3 तूरडाळ विक्रीत भेदभाव!
Just Now!
X