28 September 2020

News Flash

इंधन दरवाढीतून सामान्यांची लूट-थोरात

एकनाथ गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली मुंबईत धरणे आंदोलन

इंधन दरवाढीविरोधात काँग्रेसने सोमवारी देशव्यापी आंदोलन केले.

काँग्रेसच्या वतीने सोमवारी पेट्रोल-डिझेल दरवाढीच्या विरोधात राज्यव्यापी धरणे आंदोलन करण्यात आले.  इंधन दरवाढ मागे घेण्यासाठी आता उद्यापासून सलग पाच दिवस तालुक्या तालुक्यात आंदोलन करण्यात येईल, अशी घोषणा प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी केली. इंधन दरवाढ म्हणजे समान्यांची लूट आहे, अशी टीका त्यांनी के ली.

आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमती कमी झाल्यानंतरही भारतात पेट्रोल-डिझेलच्या किमती वाढतात कशा, असा सवाल काँग्रेस नेते व सार्वजनिक बांधकाममंत्री अशोक चव्हाण यांनी सरकारला विचारला. बाळासाहेब थोरात पुण्यात तर अशोक चव्हाण नांदेडमधील आंदोलनात सहभागी झाले होते. एकनाथ गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली मुंबईत धरणे आंदोलन करण्यात आले.

आंदोलनानंतर राष्ट्रपतींच्या नावे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन इंधन दरवाढ तात्काळ मागे घेण्याची मागणी करण्यात आली. आता उद्या ३० जूनपासून आंदोलनाचा दुसरा टप्पा सुरू होणार असून ४ जुलैपर्यंत राज्यातील सर्व तालुका मुख्यालयांच्या ठिकाणी धरणे आंदोलन करण्यात येणार आहे. सरकार ही अन्यायकारक दरवाढ मागे घेत नाही तोपर्यंत काँग्रेस पक्ष संघर्ष करत राहील, असे थोरात यांनी सांगितले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 30, 2020 12:27 am

Web Title: mumbai congress agitation against fuel price hike abn 97
Next Stories
1 परीक्षा शुल्क परत द्यावे -शेलार
2 शेतकरी हवालदिल!
3 ..तर पालकांना पुन्हा न्यायालयात दाद मागण्याची मुभा
Just Now!
X