इ-मेलचा पासवर्ड हॅक करून त्याचा गैरवापर करणाऱ्या टोळीने आता आमदार अशोक जाधव यांचाही इ-मेल हॅक केला आहे.
इ-मेल हॅक करून त्याचा गैरवापर करणाऱ्या टोळ्या सक्रिय झाल्या आहेत. अंधेरी पश्चिम विधानसभा मतदारसंघाचे आमदार अशोक जाधव यांचा इ-मेल हॅक करून त्यातून पैशांची मागणी करणारे इ-मेल अनेकांना पाठविले होते. मी परदेशात आहे. माझ्या चुलत भावाचा भारतात अपघात झाला असून त्याची पत्नी मरण पावली आहे. मला भारतात पोहोचायला ७२ तास लागतील. त्यामुळे माझ्या खात्यात त्वरीत ३ हजार डॉलर जमा करावेत, अशा आशयाचे इ-मेल अशोक जाधव यांच्या नावाने पाठवले होते. गुरूदास कामत यांनाही असे मेल मिळाले व त्यांनी जाधव यांच्याकडे चौकशी केल्यानंतरा प्रकार लक्षात आला.