News Flash

मुंबई काँग्रेसमध्ये धुसफूस; भाई जगतापांविरोधात आमदाराने केली राहुल गांधीकडे तक्रार

पंजाब, राजस्थानाताली बंड शमवण्यात गुंतलेल्या काँग्रेससमोस आणखी एक नवं आव्हान उभं राहिलं आहे. आमदार झिशान सिद्दीकी यांनी सोनिया गांधी आणि राहुल गांधी लिहिलं पत्र

पंजाब, राजस्थानाताली बंड शमवण्यात गुंतलेल्या काँग्रेससमोस आणखी एक नवं आव्हान उभं राहिलं आहे. आमदार झिशान सिद्दीकी यांनी सोनिया गांधी आणि राहुल गांधी लिहिलं पत्र.

पंजाब आणि राजस्थानातील बंड शांत करण्याच्या प्रयत्नात असलेल्या काँग्रेससमोर आणखी एक नवीन संकट उभं राहण्याची चिन्हं आहेत. मुबंई महापालिकेच्या निवडणुका हळूहळू जवळ येत असतानाच मुंबई काँग्रेसमधील धुसफूस चव्हाट्यावर आली आहे. मुंबईतील काँग्रेसचे आमदार झिशान सिद्दीकी यांनी थेट मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष भाई जगताप यांच्याविरुद्ध पक्षश्रेष्ठीकडे तक्रार केली आहे. आमदार सिद्दीकी यांनी काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी आणि काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांना पत्र लिहून भाई जगतापांविषयी आपली नाराजी व्यक्त केली आहे.

सर्वच पक्षांबरोबर काँग्रेसही मुंबई महापालिकेच्या तयारीला लागली आहे. मात्र, आता काँग्रेसमधील कलह समोर आला आहे. मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष भाई जगताप यांच्याविरोधात काँग्रेस आमदार सिद्दीकी तक्रार केली असून, जगतापांच्या कार्यपद्धतीविषयी नाराजी व्यक्त केली आहे. आपल्याला डावललं जात असल्याचा आरोप सिद्दीकी यांनी केली आहे. “माझ्या पक्षाचा अध्यक्षच माझ्याविरोधात कारवाया करत आहे. माझ्या मतदारसंघात काँग्रेस पक्षाच्या वतीने कार्यक्रम घेण्यात आला, पण स्थानिक आमदार असूनही आपल्याला बोलावलं गेलं नाही. मुंबई युवा काँग्रेस निवडणुकीत आपल्या (झिशान सिद्दीकी) उमेदवाराला मदत केल्यास पक्षात पद देणार नाही, असं नगरसेवक आणि पदाधिकारी यांना भाई जगताप यांनी सांगितलं असल्याचा आरोप,” झिशान सिद्दीकी यांनी केला आहे.

“काही दिवसांपूर्वी बीकेसी पोलीस ठाण्यात मुंबई काँग्रेसच्या वतीने पोलिसांना करोना संबंधित आवश्यक साधनसामुग्री वाटप करण्यात आली होती. त्या कार्यक्रमाला गृह राज्यमंत्री सतेज पाटील यांना देखील आमंत्रित करण्यात आलं होतं. पण स्थानिक आमदार असून, आपल्याला (झिशान सिद्दीकी) बोलवण्यात आलं नाही. प्रोटोकॉल पाळले जात नाहीत. पक्षात माझ्याविरुद्ध काम करणाऱ्यांना ताकद दिली जात आहे,” असं सिद्दीकी यांनी म्हटलं आहे.

भाई जगताप म्हणतात…

काँग्रेस पक्षश्रेष्ठीकडे आमदार सिद्दीकी यांनी तक्रार केल्याच्या वृत्तावर बोलताना भाई जगताप म्हणले, “नेमकं प्रकरण काय हे त्यालाच विचारा. प्रत्येकाला काँग्रेसमध्ये विचार मांडण्याचा अधिकार आहे. आमच्या पक्षात लोकशाही आहे. सोनिया गांधी असो किंवा राहुल गांधी असो त्यांच्याकडे विचार मांडण्याचा अधिकार आहे. मुंबईत आमचे चार आमदार आहेत. त्यापैकी तो (झिशान सिद्दीकी) सर्वात तरुण आमदार आहे. त्याचा उत्साह मी समजू शकतो. त्याचं जितकं वय आहे, त्यापेक्षा जास्त काळ मी राजकारणात आहे आणि फक्त आणि फक्त काँग्रेसमध्ये. त्यामुळे माझी कारकीर्द, कामकाजाची पद्धत नेत्यांना माहिती आहे. जाणीवपूर्वक मी अध्यक्ष म्हणून वेगळी वागणूक कुणाला देत नाही. ज्यावेळी अपेक्षा व्यक्त केल्या जातात. प्रोटोकॉल असेल, तर तो झिशान सिद्दीकीलाही लागतो आणि भाई जगतापलाही लागतो. मी झिशान सिद्दीकीशी चर्चा करुन, नाराजीबद्दल मार्ग काढेन”, असं भाई जगताप यांनी म्हटलं आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 16, 2021 3:31 pm

Web Title: mumbai congress news mumbai congress president bhai jagtap zeeshan siddique rahul gandhi sonia gandhi bmh 90
Next Stories
1 “चेहरा भोळा अन् भानगडी सोळा!”; कांजूरमार्ग कारशेडवरून मुख्यमंत्र्यांवर भाजपाचा गंभीर आरोप
2 हिरानंदानी सोसायटीतील लसीकरण प्रकरण; मुंबई पोलिसांनी दोघांना घेतलं ताब्यात
3 मुंबईत लसीकरण घोटाळा?; हाऊसिंग सोसायटीतील ३९० जणांना बोगस लस दिल्याच्या आरोपानं खळबळ
Just Now!
X