देशात महागाई मोठ्या प्रमाणावर वाढली असून त्याचा निषेध करण्यासाठी काँग्रेसकडून देशभरात आंदोलन करण्यात आलं. मुंबईत देखील मुंबई काँग्रेस अध्यक्ष भाई जगताप यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आलं. यावेळी बैलगाडी वर नेतेमंडळींचं ओझं वाझल्याने गाडी मोडली आणि भाई जगताप यांच्यासहीत सर्व नेते आणि कार्यकर्ते खाली कोसळले. या घटनेचा व्हिडीओ व्हायरल होत असताना भाजपाकडून हया व्हिडीओच्या माध्यमातून काँग्रेसवर आणि विशेषत: भाई जगताप यांच्यावर खोचक टीका करायला सुरुवात केली आहे. भाजपाचे विधान परिषद सदस्य प्रकाश लाड यांनी ट्वीट करत भाई जगताप यांच्यावर खोचक शब्दांत निशाणा साधला आहे.

“माणसानं झेपेल तेवढंच करावं”

आज मुंबईत घडलेल्या घटनेमध्ये भाई जगताप यांच्यासोबतच काँग्रेसचे अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते खाली पडले. त्यावर टोला लगावणारं ट्वीट प्रसाद लाड यांनी केलं आहे. “गाढवांचा भार उचलायला बैलांचा नकार! मा. भाई जगताप, तुम्हाला सांगू इच्छितो की माणसाने झेपेल तेवढंच करावं. असे पब्लिसिटी स्टंट करताना त्या मुक्या जिवांचा विचार करावा!” असं ट्वीट प्रसाद लाड यांनी केलं होतं.

piyush goyal marathi news
गोयल यांच्याविरोधात घोषणाबाजी; पाच जणांवर गुन्हा
Shobha Bachhav, Congress workers sloganeering,
डॉ. शोभा बच्छाव यांच्या विरोधात काँग्रेस कार्यकर्त्यांची घोषणाबाजी
EKnath Shinde and Uddhav Thackeray (1)
“दोन प्रादेशिक पक्षांकडे अजेंडा अन् झेंडाही नाही, त्यांच्यामुळे काँग्रेसची…”, मुख्यमंत्र्यांचा मविआला टोला
Yavatmal Shivsena Thackeray
यवतमाळ : शिवसेना ठाकरे गटात निवडणुकीच्या तोंडावर संघटनात्मक बदल; अनुभवी व जुन्या शिवसैनिकांना दूर सारत नवीन कार्यकर्त्यांना संधी

…आणि जागेवरच बैलगाडी मोडून पडली!

प्रसाद लाड यांनी आपल्या ट्वीटसोबत या घटनेचा व्हिडीओ शेअर केला आहे. आंदोलनासाठी आणण्यात आलेल्या बैलगाडीवर चौकट बसवण्यात आली होती. या बैलगाडीवर दाटीवाटीनं काँग्रेस कार्यकर्ते उभे होते. सगळ्यात पुढे भाई जगताप उभे होते. मात्र, अचानक गाडी मोडली आणि वर उभे असलेले सर्वजण सरळ खाली कोसळले. या प्रकारावरून भाजपाकडून मुंबई काँग्रेसला आणि भाई जगताप यांना लक्ष्य केलं जात आहे.

 

भाई जगताप, तोल सांभाळा…

दरम्यान, या प्रकारावरून भाजपा प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी देखील खोचक टीका केली आहे. “भाई जगतापजी, तोल सांभाळा… महाराष्ट्रात अभद्र आघाडी करताना राजकीय तोल गेलाच आहे. तुमचे ओझे पेलताना दोन बैलांनी अंग काढून घेतल्यावर आता सगळे काँग्रेसी कोसळात तसे राज्याच्या राजकारणातही होईल. गाडीला कोणते दोन बैल जोडावे याचा आधीच विचार करा”, असं ट्वीट केशव उपाध्ये यांनी केलं आहे.

कोणते बैल जोडायचे याचा आधीच विचार करा, नाहीतर…; भाजपाचा काँग्रेसला राजकीय सल्ला

तर दुसरीकडे विधानपरिषद विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी काँग्रेसवर टीका करताना, “राहुल गांधी जिंदाबाद घोषणा देत असताना माणसाचे तर दूरच राहिले पण बैलालाही ते सहन झाले नसावे”, असा टोला त्यांनी लगावला.