News Flash

अमित शाहंच्या मुंबई दौऱ्यामुळे संजय निरूपम स्थानबद्ध

अमित शाह मुंबईत आल्यामुळे कदाचित त्यांना आमची भीती वाटत असेल. आम्ही अडचणीचे प्रश्न विचारू, त्यांना घेराव घालू असे मुख्यमंत्री फडणवीस यांना वाटत असेल.

भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांच्या मुंबई दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष संजय निरूपम यांना त्यांच्या निवासस्थानी स्थानबद्ध करण्यात आले आहे.

भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांच्या मुंबई दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष संजय निरूपम यांना त्यांच्या निवासस्थानी स्थानबद्ध करण्यात आले आहे. निरूपम यांच्या निवासाबाहेर पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला असून त्यांच्या प्रत्येक हालचालीवर नजर ठेवण्यात आली आहे. परंतु, पोलिसांच्या या कृतीवर निरूपम यांनी आक्षेप नोंदवला असून एका तडीपाराच्या संरक्षणासाठी पोलीस सभ्य व्यक्तीच्या मागे लागल्याचे त्यांनी म्हटले आहे.

माध्यमांशी बोलताना निरूपम म्हणाले की, मी पोलिसांना याबाबत विचारले असता त्यांनी वरिष्ठांच्या आदेशाचे पालन करत असल्याचे मला सांगितले. अमित शाह मुंबईत आल्यामुळे कदाचित त्यांना आमची भीती वाटत असेल. आम्ही त्यांना अडचणीचे प्रश्न विचारू, त्यांना घेराव घालू असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना वाटत असेल. आम्ही काय गुन्हा केला आहे की पोलीस आमच्या घराबाहेर उभे आहेत, असा सवाल त्यांनी उपस्थित करत एका तडीपाराच्या सन्मानासाठी, संरक्षणासाठी पोलीस सभ्य व्यक्तीच्या मागे लागल्याची टीका त्यांनी केली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 6, 2018 3:44 pm

Web Title: mumbai congress president sanjay nirupam heavy police deployment outside his house bjp president amit shah
टॅग : Sanjay Nirupam
Next Stories
1 गर्लफ्रेंडला मारहाण केल्याच्या आरोपानंतर अरमान कोहली पसार?
2 रायगडाला हात न लावता छत्रपतींचा इतिहास पुन्हा जिवंत करणार: संभाजीराजे
3 मराठी नाट्यसंमेलनात सोमय्यांसारख्या भामट्यांची घुसखोरी: शिशिर शिंदे
Just Now!
X