News Flash

मुंबई काँग्रेसला लवकरच नवा अध्यक्ष

मुंबई काँग्रेसनंतर महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसमध्येही मोठे फे रबदल के ले जातील

(संग्रहित छायाचित्र)

मुंबई : मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेसमध्ये मोठय़ा प्रमाणावर फे रबदल करण्यात येणार आहेत. या डिसेंबरअखेपर्यंत मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष एकनाथ गायकवाड यांना बदलून त्यांच्या जागी नवीन अध्यक्षांची नियुक्ती के ली जाईल, अशी माहिती महाराष्ट्राचे पक्षाचे प्रभारी एच. के . पाटील यांनी गुरुवारी पत्रकारांना दिली. मुंबई काँग्रेसनंतर महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसमध्येही मोठे फे रबदल के ले जातील, असे त्यांनी सांगितले.

लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचा पराभव झाला. त्याची नैतिक जबाबदारी स्वीकारून मिलिंद देवरा यांनी मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला. त्यानंतर मुंबई काँग्रेसचे कार्याध्यक्ष असलेल्या एकनाथ गायकवाड यांच्याकडे अध्यक्षपदाची सूत्रे देण्यात आली.

पत्रकारांशी बोलताना, एच.के . पाटील यांनी मुंबई महापालिकेच्या निवडणुकीच्या पाश्र्वभूमीवर पक्षात संघटनात्मक पातळीवर फे रबदल करण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले.  बुधवारी मुंबईतील पक्षाचे काही नगरसेवक, पदाधिकारी यांनी पाटील यांची भेट घेतली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 4, 2020 2:16 am

Web Title: mumbai congress will soon have a new president zws 70
Next Stories
1 कंगनाचं ट्विटर हँडल बंद करण्यासाठी हायकोर्टात याचिका
2 करोनाच्या रुग्णसंख्येबाबत कुठलाही लपंडावाचा खेळ केलेला नाही – मुख्यमंत्री
3 करोना शोधासाठी आता ‘एचआरसीटी’ चाचणीची माहिती देणे सक्तीची!
Just Now!
X