News Flash

मुंबईत एका रात्रीत तीन बलात्कार

मुंबईत दोन आठवड्यांपूर्वी शक्ती मिलमध्ये महिला छायाचित्रकारावर झालेल्या सामूहिक बलात्काराच्या घटनेनंतर रविवारी रात्री बलात्काराच्या एकूण तीन घटना समोर आल्या आहेत.

| September 2, 2013 12:05 pm

मुंबईत दोन आठवड्यांपूर्वी शक्ती मिलमध्ये महिला छायाचित्रकारावर झालेल्या सामूहिक बलात्काराच्या घटनेनंतर रविवारी रात्री बलात्काराच्या एकूण तीन घटना समोर आल्या आहेत. मुंबईत एकाच रात्री विविध भागात बलात्काराच्या तीन घटनांची नोंद झाल्याने पुन्हा एकदा महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
यातील पहिली घटना ओशिवरामधील असून, एका नराधमाने ४ वर्षीय मुलीवर बलात्कार केल्याचे समोर आले आहे. सदर घटनेत आरोपीने याच परिसरातून मुलीचे अपहरण करून तिच्यावर बलात्कार केल्यांतर तिला पुन्हा ओशिवरा परिसरात सोडून दिले आणि तो फरार झाला.
दुसरी घटना वर्सोवा येथे घडली. येथे एका तरुणाने मुलीवर बलात्कार केल्याची तक्रार नोंदवली आहे. पोलिसांनी मुलीसोबत जबरदस्ती बलात्कार करणा-या तरूणाला अटक केली आहे.
तिसरी घटना जोगेश्वरी भागातील असून, आपल्याला लग्नाचे आमिष दाखवून आपल्यावर जबरदस्ती बलात्कार केल्याची तक्रार एका तरूणीने नोंदवली आहे. तीनही घटनांबाबत पोलिस अधिक तपास करत आहेत. 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 2, 2013 12:05 pm

Web Title: mumbai continue to unsafe for women 3 rape cases registered in one night
Next Stories
1 रोगापेक्षा इलाज भयंकर?
2 कोपरीतील प्रतिष्ठेच्या पोटनिवडणुकीत भाजपची बाजी
3 उर्वरित नौसैनिकांचे मृतदेह मिळण्याची शक्यता मावळलीच
Just Now!
X