मुंबई : मुंबईत बुधवारी ७८८ नव्या रुग्णांची नोंद झाली तर २७ रुग्णांचा मृत्यू झाला. मंगळवारी २९ हजारांहून अधिक चाचण्या करण्यात आल्या असून बाधितांचे प्रमाण २.७० टक्के आहे.

मुंबईत एकूण बाधितांची संख्या ७ लाख १३ हजारांपुढे गेली आहे. तर करोना मृतांची एकू ण संख्या १५ हजार १०० झाली आहे. एका दिवसात ५११ रुग्ण बरे झाल्यामुळे आतापर्यंत ६ लाख ८० हजारांहून अधिक म्हणजेच ९५ टक्के रुग्ण करोनामुक्त झाले आहेत. सध्या १५ हजार ९४७ उपचाराधीन रुग्ण आहेत. मुंबईतील रुग्णवाढीचा दर ०.१२ टक्क्यांपर्यंत खाली आला आहे. रुग्ण दुपटीचा कालावधीही ५५३ दिवसांवर पोहोचला आहे.

ठाणे जिल्ह्यात ४५४ बाधित

ठाणे जिल्ह्यात ४५४ करोना रुग्ण आढळून आले. तर २१ जणांचा मृत्यू झाला. जिल्ह्यात आतापर्यंत ५ लाख २२ हजार ९८९ रुग्ण आढळले असून ९ हजार ५७० जणांचा मृत्यू झालेला आहे. जिल्ह्यातील ४५४ करोना रुग्णांपैकी ठाणे १२०, कल्याण-डोंबिवली क्षेत्रात ११६, मीरा भाईंदर ७३, नवी मुंबई ५८, ठाणे ग्रामीण ५३, बदलापूर १३, अंबरनाथ ११, भिवंडी पाच आणि उल्हासनगरमध्ये पाच रुग्ण आढळून आले. तर कल्याण-डोंबिवलीतील पाच, ठाण्यातील पाच, ठाणे ग्रामीण चार, नवी मुंबईत तीन, मीरा भाईंदर दोन आणि भिवंडीतील दोन रुग्णांचा मृत्यू झाला.