26 February 2021

News Flash

BMCचा आक्रमक पवित्रा! नवरदेव-नवरीच्या आईवडिलांविरुद्ध गुन्हा

एका दिवसात ३२ लाखांची दंडवसुली

संग्रहित छायाचित्र

करोनाच्या प्रसाराला आळा घालण्यासाठी मुंबई महापालिकेनं पुन्हा एकदा आक्रमक पवित्रा घेतला आहे. करोना नियमाचं पालन नीट केलंय जातंय का यावर महापालिकेकडून नजर ठेवली जात असून, विविध ठिकाणी धडक कारवाई केली जात आहे. दरम्यान, महापालिकेकडून नियमांचं पालन करण्याचं आवाहन सातत्यानं केलं जात असताना चेंबूर परिसरात आदेशाला केराची टोपली दाखवण्यात आल्याचा प्रकार घडला आहे. याप्रकरणी महापालिकेनं नवरदेव-नवरीच्या आईवडिलांसह लग्न आयोजित करण्यात आलेल्या जिमखान्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

आणखी वाचा- मुंबई, पुण्यानंतर आता नागपुरातही निर्बंध लागू; शाळा, लग्नाचे हॉल बंद राहणार

चेंबूरमधील छेडानगर जिमखाना येथे विवाह सोहळ्याचं आयोजन करण्यात आलेलं होतं. विवाह सोहळ्यासाठी २०० जणांची मर्यादा महापालिकेनं ठरवून दिलेली आहे. त्याचबरोबर मास्क वापरणंही बंधनकारक केलेलं आहे. मात्र, विवाहस्थळी २०० पेक्षा अधिक गर्दी असल्याचं दिसून आलं. त्याचबरोबर सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांचाही सर्रासपणे भंग करण्यात आल्याचं आढळून आलं. याप्रकरणी महापालिकेनं नवरदेव-नवरीच्या आईवडिलांसह जिमखान्याविरुद्ध महापालिकेनं गुन्हा दाखल केला आहे.

आणखी वाचा- माझं कळकळीचं आवाहन की,…; राजेश टोपे यांचं रुग्णालयातून महाराष्ट्राला पत्र

एका दिवसात ३२ लाखांची दंडवसुली

मुखपट्टी न लावणाऱ्यांविरोधात पालिकेने कठोर पावले उचण्यास सुरुवात केली आहे. शनिवारी (२० फेब्रुवारी) एका दिवसात १६ हजार १५४ जणांकडून प्रत्येकी २०० रुपये यानुसार एकूण ३२ लाख ३० हजार ८०० रुपये दंडवसुली केली. उपाहारगृहे, क्लब, जिमखाना, चित्रपटगृहे, मंगल कार्यालये, उद्याने अशा सार्वजनिक ठिकाणी कारवाई करण्यात आली. करोनाविषयक प्रतिबंधात्मक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवरही दंडात्मक कारवाईचा बडगा उचलला आहे. मुखपट्ट्या न लावणाऱ्या १६ हजार १५४ जणांवर प्रत्येकी रुपये २०० यानुसार एकूण ३२ लाख ३० हजार ८०० रुपये दंडवसुली करण्यात आली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 22, 2021 12:47 pm

Web Title: mumbai coronavirus update fir registered after bmcs complaint against gymkhana parents of bride groom bmh 90
Next Stories
1 वरवरा राव यांना उच्च न्यायालयाकडून अंतरिम जामीन मंजूर; पण…
2 यही है अच्छे दिन?; युवा सेनेची मोदी सरकारविरोधात पोस्टरबाजी
3 सार्वजनिक कार्यक्रमांवर बंदी
Just Now!
X