23 October 2020

News Flash

मुंबईत करोना रुग्णांच्या एकूण संख्येने ओलांडला २ लाखांचा टप्पा

मुंबईत करोनाची लागण होऊन मागील २४ तासांमध्ये ४० मृत्यू

मुंबईत करोना रुग्णांच्या एकूण संख्येने दोन लाखांचा टप्पा ओलांडला आहे. मुंबईत मागील २४ तासांमध्ये २ हजार ५५ नवे करोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत. तर मागील २४ तासांमध्ये करोनाची बाधा होऊन ४० मृत्यू झाल्याचे अहवालात नोंदवण्यात आले आहे. दरम्यान करोनामुळे मुंबईत आत्तापर्यंत एकूण ८ हजार ८३१ रुग्णांना मृत्यू झाला आहे. पीटीआयने यासंदर्भातले वृत्त दिले आहे.

मुंबईत बाधित रुग्णांची एकूण संख्या २ लाख ९०१ इतकी झाली आहे. तर आत्तापर्यंत १ लाख ६४ हजार ८८२ रुग्ण करोनामुक्त झाले आहेत. मुंबईत सध्याच्या घडीला २६ हजार ७८४ अॅक्टिव्ह केसेस आहेत. दरम्यान आज राज्यभरात करोना बाधितांपेक्षा करोनामुक्त झालेल्यांची संख्या अधिक आहे. राज्यात मागील २४ तासांमध्ये १९ हजार ९३२ रुग्णांनी करोनावर मात केली. तर ११ हजार ९२१ नवे करोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. राज्याचा रिकव्हरी रेट अर्थात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण हे ७७.७१ टक्क्यांवर पोहचले आहे.

एकीकडे महाराष्ट्रासह देशभरात अनलॉकच्या प्रक्रिया सुरु झाल्या आहेत आणि दुसरीकडे महाराष्ट्राची चिंता कमी होतेय असं दिसत नाहीये. दरम्यान करोनाचा संसर्ग होऊ नये म्हणून मास्क लावणे, सोशल डिस्टन्सिंग पाळणे, हात-पाय स्वच्छ धुणे, सॅनिटायझरचा वापर, गरज असेल तरच बाहेर पडणे ही आवाहनं प्रशासनातर्फे वारंवार करण्यात येत आहेत. रुग्णसंख्या आटोक्यात आणण्यासाठी महाराष्ट्र सरकारचे आटोकाट प्रयत्न सुरु आहेत.

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 28, 2020 9:59 pm

Web Title: mumbai covid 19 tally crosses 2 lakh mark with addition of 2055 new cases scj 81
टॅग Coronavirus
Next Stories
1 उषा मंगेशकर यांना गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार जाहीर
2 शरद पवार आणि विश्वास नांगरे-पाटील यांच्यात भेट, कारण गुलदस्त्यात
3 करोना काळात ‘महात्मा फुले जन आरोग्य योजने’तून अडीच लाख रुग्णांवर उपचार!
Just Now!
X