टीआरपी गैरव्यवहाराशीही संबंध

मुंबई : गुन्हे शाखेने मंगळवारी मालाड येथील ‘बॉक्स सिनेमा’ वाहिनीच्या कार्यालयात छापा टाकून सव्‍‌र्हरसह अन्य कागदपत्रे, उपकरणे तपासासाठी जप्त केली. हा छापा  टीआरपी गैरव्यवहारासोबत ‘जंजीर’ चित्रपटाच्या स्वामीत्वहक्काशी निगडीत असल्याचे गुन्हे शाखेतील वरिष्ठ अधिकाऱ्याने स्पष्ट के ले.

निर्माता, दिग्दर्शक प्रकाश मेहरा यांनी १९७३मध्ये ‘जंजीर’ चित्रपटाची निर्मिती के ली. या चित्रपटाचे स्वामीत्व हक्क मेहरा कुटुंबियांकडे आहेत. मात्र ‘बॉक्स सिनेमा’ वाहिनीने परवानगी न घेता हा चित्रपट गेल्या वर्षी मार्चमध्ये प्रसारित केल्याचा आरोप आहे. याबाबत मेहरा यांचे पुत्र पुनीत यांनी जुहू पोलीस ठाण्यात तक्रोर दाखल के ली आहे. त्या तक्रोरीच्या आधारे जुहू पोलिसांनी गुन्हा नोंदवत दोन व्यक्तींना अटक के ली. या प्रकरणाचा तपास १ जानेवारीला गुन्हे शाखेच्या गुन्हेगारी गुप्तवार्ता विभागाकडे सोपविण्यात आला. ‘बॉक्स सिनेमा’ वाहिनीचे संस्थापक नारायण शर्मा यांना टीआरपी घोटाळ्याप्रकरणी गुन्हे शाखेने आधीच अटक  के ली होती.

‘बॉक्स सिनेमा’ वाहिनीने ‘जंजीर’ चित्रपटासोबत स्वामीत्व हक्कांचे उल्लंघन करत आणखीही अनेक चित्रपट प्रसारित के ल्याची शक्यता असून त्याबाबत तपास के ला जाईल, असे या अधिकाऱ्याने स्पष्ट के ले.

‘जंजीर’चे प्रकरण

गुन्हे शाखेच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, ‘जंजीर’ चित्रपट प्रसारित करण्यासाठी मेहरा  कुटुंबीयांची परवानगी आवश्यक आहे. मात्र या प्रकरणातील आरोपींनी परवानगीबाबतची बनावट कागदपत्रे तयार के ली. विशेष म्हणजे हा प्रकार १९९८ पासून सुरू आहे. चौकशीदरम्यान पुढे आलेल्या माहितीनुसार ‘व्हीआयपी फिल्म्स’, ‘सोनम म्युझीक’, ‘हजरा फिल्म्स’, ‘झोया फिल्म्स’कडून ही बनावट कागदपत्रे घनश्याम गिरी नावाच्या व्यक्तीकडे आली. गिरीकडून ही कागदपत्रे ‘बॉक्स सिनेमा’चे संस्थापक शर्मा यांना मिळाली. त्यानंतर शर्मा यांनी चित्रपटाचे प्रसारण ‘बॉक्सी सिनेमा’ या वाहिनीवरून के ले. गिरी आणि महोम्मद बिलाल महोम्मद गफार शेख या दोन आरोपींना जुहू पोलिसांनी अटक के ली होती. तर शर्मा यांनी अटकपूर्व जामीन मिळवला होता.