News Flash

धक्कादायक! मुंबईत हॉटेल रुममध्ये ड्रायव्हरने विवाहितेवर केला बलात्कार

उपनगरातील हॉटेलमध्ये एका महिलेवर बलात्कार केल्या प्रकरणी डीएन नगर पोलिसांनी ड्रायव्हरला अटक केली आहे.

धक्कादायक! मुंबईत हॉटेल रुममध्ये ड्रायव्हरने विवाहितेवर केला बलात्कार

उपनगरातील हॉटेलमध्ये एका महिलेवर बलात्कार केल्या प्रकरणी डीएन नगर पोलिसांनी ड्रायव्हरला अटक केली आहे. हॉटेलच्या खोलीमध्ये छुपा कॅमेरा लपवून आरोपीने या सर्व कृत्याचे रेकॉर्डिंगही केले. नंतर पीडित महिलेची बदनामी करण्यासाठी त्याने हा व्हिडिओ ऑनलाइन अपलोड केला. हा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. आरोपी बॉलिवूडमधील आघाडीच्या अभिनेत्याच्या पत्नीच्या गाडीचा ड्रायव्हर आहे. मिड डे ने हे वृत्त दिले आहे.

अशोक कुशाले असे आरोपीचे नाव असून तो गेल्या काही वर्षांपासून अभिनेत्याच्या पत्नीच्या गाडीवर ड्रायव्हिंगचे काम करत आहे. आरोपी पीडित महिलेला हॉटेलच्या रुमवर घेऊन गेला. तिथे त्याने छुपा कॅमेरा लपवून आपल्या कृत्याचे चित्रीकरण केले. काही दिवसांनी पीडित महिला त्याच हॉटेलमध्ये गेली तेव्हा तिथे तिला व्हिडिओ व्हॉट्स अॅप ग्रुपवर शेअर होत असल्याचे समजले अशी माहिती पोलीस अधिकाऱ्याने दिली.

पीडित महिलेने आरोपी अशोक कुशालेला जाब विचारल्यानंतर तिने पोलिसात तक्रार नोंदवली. त्यानंतर पोलिसांनी आरोपीला जुहू येथून अटक केली. कलम ३७६ आणि आयटी कायद्याचा विविध कलमांखाली अशोक कुशाले विरोधात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. आरोपी आणि पीडित महिला दोघेही विवाहित असून त्यांचे विवाहबाह्य संबंध असल्याचे पोलीस तपासातून समोर आले. आरोपीने व्हिडिओ सोशल मीडियावर का अपलोड केला? ते पोलीस जाणून घेण्याचा प्रयत्न करत आहेत. आरोपीला बुधवारी अंधेरी न्यायालयात हजर करण्यात आले. त्याला दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 22, 2019 7:28 pm

Web Title: mumbai crime driver held for raping woman in hotel room dmp 82
Next Stories
1 मुंबई : गटाराची झाकणं चोरणाऱ्या दोघांना अटक
2 संकटसमयी कुटुंबीयच पाठिशी! दमानियांच्या राज ठाकरेंवरील टीकेला सुप्रिया सुळेंचं उत्तर
3 लंडनमधील बाबासाहेबांचे घर संग्रहालयाचा दर्जा गमावणार?
Just Now!
X