फोर्ट परिसरातील राष्ट्रीयकृत बँकेच्या शाखेतून २.५ लाख रुपयांची रोकड घेऊन पळालेल्या ४३ वर्षीय इसमास पोलिसांनी शुक्रवारी अटक केली.
फोर्ट येथील बँकेच्या शाखेतून समीर सय्यद याने २.५ लाख रुपयांची रोकड लुटून पलायन केले. बँकेच्या प्रवेशद्वारात उभ्या असलेल्या सुरक्षा रक्षकाला धक्का देऊन तो बँकेबाहेर पळाला. मात्र माता रमाबाई आंबेडकर मार्ग पोलीस ठाण्यातील गस्तीवर असलेल्या पोलीस अधिकाऱ्यांनी पाठलाग करुन समीरला पकडले. त्याच्याकडील रोकड पोलिसांनी जप्त केली असून त्याच्याविरुद्ध माता रमाबाई आंबेडकर मार्ग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

लक्ष विचलित करून अडीच लाखांची चोरी
ठाणे : बँकेतून चेक वटवून निघालेल्या ५० वर्षीय व्यक्तीच्या अंगावर खाजेचे पदार्थ टाकून त्याचे लक्ष विचलित झाल्यानंतर त्याच्याकडची सुमारे अडीच लाखांची पिशवी दोन अनोळखी चोरटय़ांनी लंपास कली. शनिवारी दुपारी सव्वाआकराच्या सुमारास ही घटना घडली. या प्रकरणी वर्तकनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ठाण्यातील वर्तनगर येथील प्रकाश सोसायटीमध्ये राहणारे बाळासाहेब जाधव परिसरातील ठाणे जनता सहकारी बँकेतून अडीच लाखांचा चेक वटवून पैसे पिशवीत घेऊन पायी चालले होते. वर्तकनगर नाका येथील रस्त्यावरून पायी चालत असताना दोन व्यक्तींनी त्यांच्या अंगावर खाज येणारा पदार्थ टाकला आणि पिशवी चोरून नेली.