News Flash

मुंबई : बलात्कार करून महिलेचा चिरला गळा; ‘बीकेसी’ परिसरातील नाल्याजवळ सापडला मृतदेह

'एमटीएनएल' नाल्याजवळ पडलेला होता मृतदेह

महिलांवरील अत्याचारांच्या घटना वारंवार घडत असून, हा मुद्दा सातत्याने चर्चेत आहे. अशातच हादरवून टाकणारी बलात्काराची एक घटना समोर आली आहे. मुंबईतील वांद्रे कुर्ला संकुल अर्थात बीकेसी परिसरातील एका नाल्याजवळ महिलेचा मृतदेह सापडला आहे. बलात्कार करून महिलेची हत्या करण्यात आली असून, याप्रकरणी पोलीस तपास करत आहेत.

टाईम्स ऑफ इंडिया या दैनिकाने याबद्दलचं वृत्त दिलेलं आहे. बीकेसीजवळ परिसरातील एमटीएनएल जंक्शन येथील नाल्याजवळ एका महिलेचा मृतदेह मंगळवारी (११ मे) आढळून आला. महिलेची गळा चिरून हत्या करण्यात आल्याचं प्रथमदर्शनी दिसत होतं. काही स्थानिक नागरिकांना मृतदेह दिसला. त्यानंतर त्यांनी पोलीस नियंत्रण कक्षाला याची माहिती दिली. त्यानंतर बीकेसी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.

हत्या करण्यापूर्वी महिलेवर बलात्कार करण्यात आल्याचे प्रथमदर्शनी पोलिसांना दिसून आलं. त्यानंतर पुढील तपासात गुप्तांगावर जखमा आढळून आल्या. तसेच महिलेचा गळा चिरून हत्या करण्यात आल्याचं स्पष्ट झालं. याप्रकरणी भादंवि कलम ३७६ (बलात्कार) आणि कलम ३०२ (हत्या) या कलमान्वये अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मयत महिला देहविक्रीचा व्यवसाय करत होती, असं प्राथमिक तपासातून समोर आलं आहे. पैशाच्या वादातून महिलेची हत्या करण्यात आली असावी, असा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला असून, याप्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत. पोलिसांनी घटना घडलेल्या परिसरातील सर्व सीसीटीव्हीचे फुटेज मागविले आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 12, 2021 1:03 pm

Web Title: mumbai crime woman raped in mumbai her body with throat slit found near bandra kurla complex bmh 90
Next Stories
1 केंद्रानं लसीकरणाचं ओझं टाकलं राज्यांच्या खांद्यावर, ३५ हजार कोटींचं काय झालं; रोहित पवारांचा सवाल
2 मुंबई: करोनामुळे पत्नीचा मृत्यू झाल्याने नैराश्य; ६ वर्षांच्या मुलीची हत्या करुन घेतला गळफास
3 प्रभागनिहाय लसीकरण केंद्रे बंद
Just Now!
X