मुंबई डबावाला असोसिएशनचे अध्यक्ष सुभाष तळेकर यांना घाटकोपर पोलिसांनी अटक केली आहे. कर्ज देण्यासंदर्भात खोटी आश्वासनं देऊन फसवणूक केल्याच्या गुन्ह्याखाली सोमवारी रात्री तळेकर यांना पोलिसांनी अटक केली. मुंबईतील डबेवाल्यांच्या एका संघटनेने तळेकरांविरोधात तक्रार दाखल केल्यानंतर ही अटकेची कारवाई करण्यात आल्याची माहिती मुंबई पोलिसांनी दिली आहे.

“आमच्या एका टीमने तळेकर यांना पुणे जिल्ह्यात असणाऱ्या त्यांच्या गावातून ताब्यात घेतलं. मंगळवारी सकाळी तळेकर यांना मुंबईत आणण्यात आलं आहे. आज पोलीस तळेकरांना न्यायालयासमोर हजर करतील,” अशी माहिती घाटकोपर पोलीस स्थानकातील वरिष्ठ निरिक्षक असणाऱ्या निती अलकनुरे यांनी वृत्तसंस्थेशी बोलताना दिली.

Cyber ​​criminals, Jalgaon
सायबर गुन्हेगारांचा नफ्याच्या आमिषाने जळगावात अनेकांना गंडा; शिक्षक, डॉक्टरांचाही फसवणूक झालेल्यांत समावेश
dhananjay mahadik statment about shoumika mahadik contesting poll from hatkanangale constituency
हातकणंगलेत शौमिका महाडिक यांच्यासाठी लढण्यास तयार – धनंजय महाडिक
Nashik Lok Sabha
साहेब, जागा वाचवा… – नाशिकच्या शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्यांचे मुख्यमंत्र्यांना साकडे
Major office bearers of Congress in Buldhana Lok Sabha constituency tendered their collective resignations
बुलढाणा: काँग्रेसच्या शेकडो पदाधिकाऱ्यांचे राजीनामे… ‘हे’ आहे कारण…

या फसवणुकीच्या प्रकरणामध्ये पोलीस तळेकर यांच्यासोबतच त्यांचे साथीदार असणाऱ्या विठ्ठल सावंत यांच्याही मागावर आहेत. सावंत हे फरार असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत. घाटकोप पोलिसांनी मागील वर्षी म्हणजेच २०२० साली फेब्रुवारी महिन्यामध्ये तळेकरांविरोधात गुन्हा दाखल केला होता. दुसऱ्या डबेवाल्या संघटनेतील २२ डबेवाल्यांच्या नावाने दुचाकी (मोपेड्स) घेण्यासाठी तळेकर आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी कर्ज घेतलं. मात्र या डबेवाल्यांना त्यांनी दुचाकी दिल्या नाहीत असा आरोप तक्रारदार डबेवाल्यांनी केला आहे. या प्रकरणात पोलिसांनी फसवणूक, विश्वासघात करणे या गुन्ह्यांखाली कारवाई केली आहे.

तळेकर हे मुंबई जीवन डबे वाहतूक मंडळ या संघटनेचे प्रवक्ते होते. याच संघटनेतील डबेवाल्यांची तळेकर यांनी फसवणूक केल्याचा आरोप केला जात आहे. ही फसवणूक उघडकीस आल्यानंतर तळेकर यांना प्रवक्तेपदावरुन काढून टाकण्यात आलं. त्यानंतर त्यांनी मुंबई डबेवाला असोसिएशनची स्थापना करुन त्याचं अध्यक्षपद भूषवलं.

करोनामुळे मुंबईकरांचे पोट भरणाऱ्या डबेवाल्यांनाही मोठा फटका बसला आहे. मागील नऊ महिन्यांपासून डबेवाल्यांचं वेळापत्रक आणि व्यवसाय पूर्णपणे कोलमडला असून अनेक डबेवाल्यांकडे आजही काम नाहीय. मागील १२५ वर्षांपासून मुंबईकरांच्या सेवेत असणाऱ्या डबेवाल्यांवर पहिल्यांदाच एवढ्या दिर्घकाळ कामाशिवाय राहण्याची वेळ आळी आहे.

डबेवाल्यांना मदत करण्यासाठी शहरातील अनेक डबेवाल्या संघटनांनी नाशिक आणि पुण्यातील १७ स्थानिक गटांशी आणि ग्रामपंचायतींशी चर्चा करुन मुंबईमध्ये भाज्यांचे स्टॉल सुरु केले आहेत.