08 December 2019

News Flash

रस्त्यावर गाजर ज्यूस पित असाल तर सावधान! आधी हा व्हिडीओ पाहा

हा व्हिडीओ पाहून तुम्हीही शंभर वेळा विचार कराल

आपण अनेकदा प्रवासादरम्यान रस्त्यात थांबून थंडपेय पितो किंवा निरनिराळे ज्युसही पितो. रस्त्यावर तयार होणारे हे ज्युस कसे तयार होत असतात याची आपल्याला कल्पनाही नसते. तसेच यासाठी वापरण्यात येणारे पदार्थ कुठून आणि कसे आणले जातात, आपण घरात आणत असलेल्या भाज्याही कशाप्रकारे आपल्यापर्यंत पोहोचत असतात याची माहिती आपल्याला नसते. असाच एक व्हिडीओ सध्या मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ दादरमध्ये असलेल्या प्लाझा मार्केटमधील असल्याचे सांगितले जात आहे.

या व्हिडीओमध्ये एक व्यक्ती ड्रममध्ये असलेले गाजर पायाने धुवत असल्याचे दिसत आहे. तसेच दुसरी एक व्यक्ती व्हिडीओ तयार करणाऱ्या व्यक्तीशी अरेरावी करतानाही दिसत आहे. यामध्ये व्हिडीओ तयार करणारी व्यक्ती समोरील व्यक्तीला गाजर हाताने धुण्यास सांगत आहे. त्यावर आपण किती गाजर हाताने धुवायची. तुम्ही माती लागलेली गाजर खाणार का? असा उलटा सवाल समोरील व्यक्ती करताना दिसत आहे.

दरम्यान, नेटकऱ्यांनीही यावर संतप्त प्रतिक्रिया देत संबंधितांवर कारवाईची मागणी केली आहे. यापूर्वी कुर्ला रेल्वे स्थानकावरही असा प्रकार समोर आला होता. रेल्वे स्थानकावर असलेल्या स्टॉलमधील एक व्यक्ती लिंबू सरबतासाठी तयार केलेल्या पाण्यातच हात धुवत असल्याचा व्हिडीओ समोर आला होता. त्यानंतर रेल्वेने त्याच्यावर कारवाई केली होती. असे प्रकार सर्रास होत असल्याने नागरिकांच्या जिवाशी खेळ असल्याच्या प्रतिक्रिया आता उमटू लागल्या आहेत.

First Published on August 14, 2019 8:58 am

Web Title: mumbai dadar market viral video man washing carrots with his feet jud 87
Just Now!
X