अंडरवर्ल्ड डॉन अरुण गवळी गँगमधील ३६ वर्षीय सदस्याने नवी मुंबईतील तळोजा कारागृहात बुधवारी रात्री आत्महत्या केल्याचे समोर आले आहे. त्याच्या आत्महत्येचे कारण अद्याप समोर आलेले नाही. स्वतःच्या पत्नीला बेदम मारहाण केल्याप्रकरणी त्याला काही दिवसांपूर्वी अटक झाली होती. त्यानंतर त्याची तळोजा कारागृहात रवानगी करण्यात आली होती. पोलीस महानिरिक्षक दीपक पांडे यांनी या घटनेला दुजोरा दिला आहे.

पोलिसांच्या माहितीनुसार, दिनेश लक्ष्मण नारकर (वय ३६) ऊर्फ दिन्या असे गवळी गँगमधील या मृत सदस्याचे नाव आहे. पत्नीवर धारदार शस्त्राने वार करीत तिला जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी त्याला १० जुलै रोजी कलम ३०७ कलमांतर्गत एन. एम. जोशी मार्ग पोलिसांनी अटक केली होती. त्यानंतर २० जुलै रोजी त्याची तळोजा कारागृहात रवानगी करण्यात आली होती. हिंदुस्तान टाइम्सने याबाबत वृत्त दिले आहे.

BJP candidate Ramdas Tadas has two offices in the city without obeying the order of Amit Shah
अमित शहांचा आदेश पाण्यात, भाजप उमेदवाराची शहरात दोन कार्यालये
eknath shinde
मित्रपक्षांकडून युती धर्माचे पालन नाही; शिंदे गटाच्या आमदारांकडून नाराजी; ठाणे, पालघर पक्षाकडेच ठेवण्यासाठी आग्रह
Rameshwar Cafe Bomb blast
Bengaluru: रामेश्वरम कॅफे बॉम्बस्फोट प्रकरणी भाजपा कार्यकर्त्याला अटक, संशयितांशी संबंध असल्याचा दावा
Rape of accused wife
चंद्रपूर : रक्षक नव्हे राक्षसच! पोलीस हवालदाराचा आरोपीच्या पत्नीवर बलात्कार; पोलीस प्रशासनात खळबळ

दरम्यान, तळोजा कारागृहाचे पोलीस अधीक्षक कौस्तुभ कुर्लेकर यांनी सांगितलं की, “बुधवारी रात्री ९ वाजण्याच्या सुमारास कारागृहातील रक्षक गस्तीवर असताना दिनेश नारकर त्याला स्वच्छतागृहात अत्यवस्थ आढळला. त्यानंतर त्याला कारागृहाच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, तिथं त्याला मृत घोषित करण्यात आले.”

दिनेश नारकर हा प्रभादेवी येथील संजीवनी प्रसाद बिल्डिंग येथे रहायला होता. त्याला सन २०१७ मध्ये शिवसेना नगरसेवक कमलाकर जामसंडेकर यांच्या हत्येप्रकरणी टोळीप्रमुख अरुण गवळी आणि इतर सदस्यांबरोबर अटक झाली होती. नंतर या प्रकरणातून तो निर्दोष सुटला होता. सन २०१८मध्ये देखील त्याला एका पोलीस कर्मचाऱ्याला मारहाणप्रकरणी अटक झाली होती.