मुंबईतील सँडहर्स्ट रोड स्टेशनजवळ एका गोदामाला बुधवारी दुपारी भीषण आग लागली. डोंगरी परिसरात हे गोदाम असून अागीचे वृत्त समजताच अग्निशमन दलाचे पथक घटनास्थळी दाखल झाले आहे. आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरु असून आगीचे नेमके कारण अद्याप अस्पष्ट आहे.

डोंगरी परिसरात एक गोदाम असून या गोदामात बुधवारी दुपारी भीषण आग लागली. आग झपाट्याने पसरत असून आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरु आहेत. आग पसरत असल्याने गोदामाजवळचा परिसर खाली करण्यात आला आहे.