05 June 2020

News Flash

वाळकेश्वरमधील लिजंड इमारतीमध्ये आग

लिजंड इमारतीमध्ये अशोक चव्हाण यांचे घर

वाळकेश्वर परिसरात लिजंड ही ३१ मजल्यांची इमारत असून या इमारतीच्या १७ व्या मजल्यावर सोमवारी दुपारी आग लागली.

मुंबईतील वाळकेश्वर परिसरातील लिजंड इमारतीच्या १७ व्या मजल्यावर सोमवारी दुपारी भीषण आग लागली. लिजंड इमारतीमध्ये अशोक चव्हाण यांचे देखील घर असल्याचे समजते. आगीचे नेमके कारण अजून अस्पष्ट असून अग्निशमन दलाचे पथक घटनास्थळी पोहोचले आहे.

वाळकेश्वर परिसरात लिजंड ही ३१ मजल्यांची इमारत असून या इमारतीच्या १७ व्या मजल्यावर सोमवारी दुपारी आग लागली. आग इतकी भीषण होती की आग पसरत १८ व्या मजल्यापर्यंत पोहोचली. या इमारतील अशोक चव्हाण यांच्या सारख्या दिग्गज लोकांचे घर आहे. चव्हाण यांचे घर कोणत्या मजल्यावर आहे हे समजू शकलेले नाही. या इमारतीतील बहुसंख्य फ्लॅट हे रिकामे असून काही घरांमध्ये फक्त केअर टेकर राहतात. इमारतीतील बहुसंख्य घर मालक हे परदेशात राहतात.

घटनास्थळी दाखल झालेल्या अग्निशमन दलाच्या जवानांनी सर्वप्रथम या इमारतीत अडकलेल्या लोकांची सुटका करण्याचे काम हाती घेतले. आग कशामुळे लागली, हे अद्याप समजू शकलेले नाही. अग्निशमन दलाच्या १० गाड्या घटनास्थळी पोहोचल्या आहेत. अद्याप आगीत जीवितहानी झालेली नाही, असे सूत्रांनी सांगितले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 25, 2017 6:10 pm

Web Title: mumbai fire breaks out on 17th floor of legend building in walkeshwar fire tenders on spot ashok chavan flat
टॅग Fire
Next Stories
1 जाणून घ्या मुंबईतील एसी लोकलचे दर आणि वेळापत्रक
2 मुंब्य्रातील शाळेत हिजाब बंदी, पालकांमध्ये नाराजी
3 जवानांची बलिदाने ‘चुनावी जुमले’ ठरू नयेत, सेनेचा मोदींना टोला
Just Now!
X