25 February 2020

News Flash

मुंबई अग्निशमन दलाच्या ताफ्यात ‘फायर रोबो’

फायर रोबोतून वरच्या दिशेला ३८ अंश आणि खालच्या दिशेला ३० अंश कोनात पाण्याचा मारा करता येतो.

(संग्रहित छायाचित्र)

मुंबई अग्निशमन दलाच्या ताफ्यात ‘फायर रोबो’ दाखल करण्यात आला असून जलद बचावकार्य करण्यात हातखंडा असलेला हा या प्रकारचा भारतातील पहिला रोबो आहे.

फायर रोबोतून वरच्या दिशेला ३८ अंश आणि खालच्या दिशेला ३० अंश कोनात पाण्याचा मारा करता येतो. एका वेळी अडीच तास काम करण्याची क्षमता त्याच्यात आहे. हा रोबो वायरलेस रिमोटच्या साहाय्याने दीड मीटर प्रतिसेकंद या वेगाने ३०० मीटपर्यंत चालवता येऊ  शकतो. सकिंग अँटेना लावल्यास १ किमीपर्यंतही चालवता येतो. प्रतिसेकंद ८० लिटर पाणी फेकण्याची क्षमता याच्यात आहे. ५३ इंच लांब आणि ४४ इंच उंच अशा फायर रोबोचे वजन ५२० किलो आहे.

रोबो चोहोबाजूंनी आगीने वेढलेला असल्यास त्याची हानी होण्याची शक्यता असते. त्यामुळे रोबोच्या भोवती सतत पाण्याचा फवारा करून त्याचे रक्षण करण्याची सोय यात आहे. रोबोच्या पुढे-मागे कॅमेरे बसवण्यात आले आहेत. तसेच नाइट व्हिजन आणि थर्मल इमेजिंग कॅमेरेही आहेत. इमेज ट्रान्समिशन आणि डेटा ट्रान्समिशन अँटेना असल्यामुळे रोबोद्वारे अपघातस्थळाची माहिती मिळवणे शक्य होईल. किती माणसे अडकली आहेत हेसुद्धा जाणून घेता येणार आहे. बोरिवली प्रादेशिक समादेश केंद्राचे उद्घाटनप्रसंगी बुधवारी हा रोबो सेवेत दाखल झाला. यावेळी महापौर विश्वनाथ महाडेश्वर आणि युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे उपस्थित होते.

नव्याने सुरू झालेल्या प्रादेशिक समादेश केंद्राच्या अंतर्गत गोरेगाव, मालाड, कांदिवली, चिंचोली, दहिसर, दिंडोशी व कांदरपाडा अग्निशमन केंद्रांचा समावेश आहे. गगनचुंबी इमारतींवर पाण्याचा फवारा करण्यासाठी हायड्रॉलिक प्लॅटफॉर्म ही ८१ मीटरची शिडी पूर्वी भायखळा केंद्रावरून येत असे. त्यामुळे घटनास्थळी मदत पोहोचण्यास बराच अवधी जाई. मात्र बोरिवली प्रादेशिक समादेश केंद्रात ही शिडी उपलब्ध आहे. कंट्रोल पोस्ट, रेस्क्यू व्हॅन, बी. ए. व्हॅन, पूरस्थितीत व समुद्रात बुडणाऱ्या व्यक्तीचे प्राण वाचवण्यासाठी आवश्यक असणारी इन्फ्लेटेबल बोट आणि जेटस्की उपलब्ध आहे.

वायरलेस रिमोटची रचना

फायर रोबोमध्ये असलेल्या इन्फ्रारेड सेन्सर आणि डबल वॉटर कर्टनमुळे रोबोचे तापमान नियंत्रणात राहू शकते. तसेच ऑब्स्टॅकल्स अव्हॉयडन्स सेन्सरमुळे रोबोला अडथळ्यांतून मार्ग काढण्यास मदत होईल. जॉय स्टीक, स्टियरिंग लॉक, ऑब्स्टॅकल अव्हायडन्स, रोबो वर-खाली करण्याकरता लो स्पीड बटन, रेकॉर्डिग बटन, वॉटर मॉनिटर बटन, कॅमेरा जॉयस्टिक, चार अँटेना अशी वायरलेस रिमोटची रचना आहे.

First Published on July 19, 2019 1:10 am

Web Title: mumbai fire service force fire robots abn 97
Next Stories
1 केईएममधील शस्त्रक्रियेचे लंडनमध्ये थेट प्रक्षेपण
2 ‘पालिकेकडून कितीही नोटीस येऊ देत, तुम्ही अजिबात हलायचं नाही’, राज ठाकरेंचा कोळी बांधवांना सल्ला
3 मुंबईतील पाणीकपात रद्द होणार?
Just Now!
X