मुंबई : राज्य मंडळाचा निकाल घटूनही यंदा नामांकित महाविद्यालयांत अकरावीच्या पहिल्या यादीतील प्रवेश पात्रता (कट ऑफ) गुण नव्वद टक्क्यांपेक्षा अधिक आहेत. वाणिज्य शाखेतील प्रवेशासाठी अधिक स्पर्धा दिसत आहे. पहिल्या यादीत अर्ज केलेल्या ७२ टक्के विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात आले आहेत.

अकरावी प्रवेशाची पहिली गुणवत्ता यादी शुक्रवारी सायंकाळी जाहीर करण्यात आली. यंदा अर्ज केलेल्या १ लाख ८५ हजार ३१८ विद्यार्थ्यांपैकी १ लाख ३४ हजार ४६७ विद्यार्थ्यांना पहिल्या यादीत प्रवेश देण्यात आले आहेत. अर्ज केलेल्या ५० हजार ८५१ विद्यार्थ्यांना या फेरीत प्रवेश मिळालेले नाहीत.

दहावीचा निकाल घसरला असला तरी इतर मंडळांचे निकाल चढे होते. त्याचा परिणाम पहिल्या प्रवेश यादीवर दिसून येत आहे. वाणिज्य शाखेचे अनेक महाविद्यालयांचे कट ऑफ गुण गेल्या वर्षीच्या तुलनेत एखाद्या टक्क्यानेच कमी झाले आहेत. विज्ञान आणि कला शाखेचे कट ऑफ गेल्या वर्षीच्या तुलनेत एक ते दोन टक्क्यांनी कमी झाल्याचे दिसत आहे.

पहिल्या पसंतीचे महाविद्यालय ४८ हजार ८७२ विद्यार्थ्यांना मिळाले आहे. या विद्यार्थ्यांना मिळालेल्या महाविद्यालयांत प्रवेश घेणे बंधनकारक असून हे विद्यार्थी आता प्रवेश प्रक्रियेतून बाहेर पडतील. दुसऱ्या पसंतीक्रमापासून पुढील महाविद्यालय मिळालेले विद्यार्थी प्रवेश निश्चित न केल्यास पुढील फेरीत सहभागी होऊ  शकतात.

या वर्षी प्रथमच असलेल्या मराठा (एसईबीसी) आणि आर्थिकदृष्टय़ा दुर्बल घटकातील (ईडब्लूएस) विद्यार्थ्यांसाठी राखीव जागा ठेवण्यात आल्या होत्या. एसईबीसी ३२८७ तर ईडब्लूएस प्रवर्गातून ५९७ विद्यार्थ्यांना या यादीत प्रवेश देण्यात आला आहे.

गुणवत्ता यादी : (टक्क्यांमध्ये)

’ एचआर  – वाणिज्य : ९२.४

’ केसी – कला : ८७.८६  वाणिज्य : ९०.२  विज्ञान : ८५.८

’ जय हिंद – कला : ९०.८  वाणिज्य : ९०.४  विज्ञान : ८३.६

’ रुइया – कला : ९२.६ विज्ञान : ८५.८

’ पोद्दार – वाणिज्य : ९२.८

’ रुपारेल – कला : ८६.२  वाणिज्य : ८८.८  विज्ञान : ८८.२

’ साठय़े – कला : ७३.८  वाणिज्य : ८६.८  विज्ञान : ८४.४

’ डहाणूकर – वाणिज्य : ८९.४

’ भवन्स – कला : ८४.२  वाणिज्य : ८६  विज्ञान : ८२

’ मिठीबाई – कला : ८६.६  वाणिज्य : ९०.६  विज्ञान : ८३.८

’ एनएम  – वाणिज्य : ९३.६

’ वझे-केळकर – कला : ८६.४  वाणिज्य : ९०.२  विज्ञान : ९१.२

’ झेविअर्स – कला : ९४  विज्ञान : ८६.६

’ हिंदुजा – वाणिज्य : ८५.४

 

शाखा   आलेले अर्ज  महाविद्यालय  मिळालेले विद्यार्थी

कला            १७,२८४ १४,१३१

वाणिज्य      १,१७,२०२  ८०,४०२

विज्ञान            ४९,४७८ ३८,७१४

एमसीव्हीसी     १,३५४  १,२२०

शाखानिहाय पसंतीक्रमानुसार विद्यार्थी संख्या

पसंती                                कला           वाणिज्य        विज्ञान           एमसीव्हीसी

पहिला पसंतीक्रम                ७३३७         २३३४९           १७०५२            ११३४

दुसरा पसंतीक्रम                 २३७८         १३१३७              ६८७८              ६४

तिसरा पसंतीक्रम                 १३२३          ९८९५               ४१५२            २०

चौथा पसंतीक्रम                    ९७५            ७९७९              ३१५३             ०१

पाचवा पसंतीक्रम                   ६५७              ७११६              २३५३            ०