News Flash

मुंबई सामुहिक बलात्कार: चार आरोपींना न्यायालयीन कोठडी

मुंबईतील वृत्तछायाचित्रकार तरुणीवरील सामुहिक बलात्कार प्रकरणातील चार आरोपींना गुरुवारी न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली.

| September 5, 2013 02:00 am

मुंबई सामुहिक बलात्कार: चार आरोपींना न्यायालयीन कोठडी

मुंबईतील वृत्तछायाचित्रकार तरुणीवरील सामुहिक बलात्कार प्रकरणातील चार आरोपींना गुरुवारी न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली. शिराज रेहमान खान, विजय जाधव, कासिम बंगाली आणि सलिम अन्सारी यांना १९ सप्टेंबरपर्यंत न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले.
नराधमांचे आणखी पाशवी कृत्य
मुंबईत २२ ऑगस्ट रोजी महालक्ष्मी येथील शक्ती मिल कपाउंडमध्ये छायाचित्रकार तरुणीवर सामुहिक बलात्कार करण्यात आला होता. संबंधित तरुणीने आणि तिच्या सहकारी मित्राने दिलेल्या माहितीच्या आधारे मुंबई पोलिसांनी चार आरोपींना मुंबईमधून तर एकाला दिल्लीतून अटक केली. या सर्व आरोपींना न्यायालयाने पोलिस कोठडी सुनावली होती. त्याची मुदत गुरुवारी संपत असल्याने त्यांना न्यायालयात हजर करण्यात आले होते. यावेळी सरकारी वकिलांनी त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावण्याची मागणी केली. दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकल्यानंतर न्यायालयाने चौघांनाही १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली.
बलात्कार प्रकरणातील एक आरोपी अल्पवयीन! 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 5, 2013 2:00 am

Web Title: mumbai gangrape four accused sent to judicial custody till sep 19
Next Stories
1 सहकारी साखर कारखान्यांच्या विक्रीवर बंदी!
2 रघु‘रामप्रहर’!
3 खुशामतखोरी वादात!
Just Now!
X