News Flash

‘पंचगंगा’ पाहणीस अटकाव करणाऱ्या कारखान्यांवर कारवाई

प्रक्रिया न केलेली रासायनिक द्रव्ये पंचगंगेत टाकून नदी प्रदूषित करणाऱ्या, विशेष करून नदीला पूर्वरूप देण्याच्या हेतूने नदी परिसराच्या ‘नीरी’तर्फे करण्यात येणाऱ्या

| December 21, 2013 03:07 am

प्रक्रिया न केलेली रासायनिक द्रव्ये पंचगंगेत टाकून नदी प्रदूषित करणाऱ्या, विशेष करून नदीला पूर्वरूप देण्याच्या हेतूने नदी परिसराच्या ‘नीरी’तर्फे करण्यात येणाऱ्या पाहणीस अटकाव करणाऱ्या औद्योगिक कारखान्यांवर कठोर कारवाई करा, असे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने शुक्रवारी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाला (एमपीसीबी) दिले.
पंचगंगा प्रदूषणाचा मुद्दा दत्तात्रय माने आणि अन्य चौघांनी जनहित याचिकेद्वारे उच्च न्यायालयासमोर आणत या प्रदूषणाला जबाबदार औद्योगिक कारखान्यांवर तसेच कोल्हापूर आणि इचलकरंजी पालिकांच्या दोषी अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी केली आहे. न्यायमूर्ती एस. जे. वझिफदार आणि न्यायमूर्ती गौतम पटेल यांच्या खंडपीठासमोर त्यावर सुनावणी झाली. त्या वेळी न्यायालयाने हे आदेश दिले. मागच्या सुनावणीच्या वेळेस न्यायालयाने राष्ट्रीय पर्यावरण अभियांत्रिकी संशोधन संस्थेला (नीरी) नदीच्या प्रदूषणाचा मुद्दा हाती घेण्याचे निर्देश दिले होते. तसेच नदी परिसराची पाहणी करून नदीच्या प्रदूषणाला कोणत्या बाबी जबाबदार आहेत, काय पावले उचलल्यास नदीला पूर्ववत करता येऊ शकेल, याचा प्रस्ताव सादर करण्याचे आदेश दिले होते.
शुक्रवारच्या सुनावणीत ‘नीरी’च्या जलतज्ज्ञाने न्यायालयाच्या आदेशानुसार आपण नदीच्या प्रदूषणाची समस्या दूर करण्यासाठी तयार असल्याचे न्यायालयाला सांगितले. तसेच त्याबाबतचा सविस्तर प्रस्ताव पालिकेकडे सोपविण्यात येईल, असेही सांगण्यात आले. त्याच वेळी नदी परिसरातील काही कारखान्यांनी पाहणी करण्यास नकार दिल्याची तक्रारही त्याने केली. या कारखान्यांनी या पाहणीत आडकाठी आणू नये असे आदेश देण्याची विनंती केली. त्याची दखल घेत नदीच्या ४५ किलोमीटर परिसरात येणाऱ्या कारखान्यांकडून पाहणीत अडथळा आणला जाणार नाही याची हमी ‘नीरी’ला द्यावी, असे आदेश न्यायालयाने राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाने दिले. तसेच पाहणीत अडथळा आणणाऱ्या कारखान्यांवर कारवाई करण्याचेही आदेश न्यायालयाने या वेळी मंडळाला दिले. त्यानंतर मंडळाकडूनही आदेशाची पूर्तता करण्याची हमी देण्यात आली. 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 21, 2013 3:07 am

Web Title: mumbai hc order hard action against factories responsible for pollution of river
Next Stories
1 शिवाजी साटम यांना जनकवी पी. सावळाराम पुरस्कार
2 ‘झोपु’त वाढीव चटईक्षेत्रफळाचा नवा घोटाळा?
3 चार महिन्यांच्या मुलीचा डेंग्यूने मृत्यू महापालिकेत पडसाद
Just Now!
X