News Flash

मुंबई पोलीस दलातून ‘हिना’ आणि ‘विकी’ सेवानिवृत्त

गेल्या दहा वर्षात हिनाने अनेक गुन्ह्यांचा छडा लावला. तिने अपेक्षेपेक्षा चांगलीच कामगिरी बजावली म्हणूनच...

मुंबई पोलिसांना अनेक गुन्ह्यांचा छडा लावण्यात महत्त्वाची भूमिका बजावणारे हिना आणि विकी हे दोन श्वान निवृत्त झाले आहेत. वयाच्या दुसऱ्या महिन्यापासून मुंबई पोलीस दलात दाखल झालेले हे दोन्ही श्वान काल(बुधवारी) १० वर्षांच्या सेवेनंतर निवृत्त झाले.

बुधवारी तब्बल दहा वर्षाच्या सेवेनंतर या दोन्ही श्वानांना मुंबईचे पोलीस आयुक्त सुबोध जयस्वाल यांनी सन्मानाने निवृत्ती दिली. २४ जानेवारी २००८ रोजी जन्मलेली हिनाचा दोन महिन्यांची असताना मुंबई पोलिसांच्या श्वान पथकात समावेश झाला होता. गेल्या दहा वर्षात हीनाने अनेक गुन्ह्यांचा छडा लावला. तिने अपेक्षेपेक्षा चांगलीच कामगिरी बजावली म्हणूनच अनेक पुरस्कार देऊन गौरवण्यात देखील आलं आहे. काही वर्षापूर्वी भोईवाडा परिसरात फुटपाथवर झोपलेल्या एका तरूणाची डोक्यात दगड घालून हत्या असो, कुर्ल्यात लहान मुलीच्या हत्या आणि बलात्काराच्या घटना असोत किंवा खार परिसरातील जेष्ठ नागरिक दाम्पत्तची हत्या असो, हिनाने प्रत्येक वेळेस गुन्हेगाराला अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावली.

तर, विकी हा श्वान देखील हिना पाठोपाठ पोलिस दलात दाखल झाला होता. २६ जून २००८ रोजी जन्मलेला विकी यानेही अनेक गंभीर गुन्ह्यांचा छडा लावण्यात मोलाची भूमिका बजावली. आझाद मैदान पोलीस क्लब येथे निवृत्तीच्या वेळी हिनाचे हँडलर्स उमेश चापटे, विकास शेंडगे आणि विकीचे हँडलर्स बाळासाहेब चव्हाण आणि दीपक देशमुख हेही उपस्थित होते.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 1, 2018 9:11 am

Web Title: mumbai heena and vicky two dogs of mumbai police crime dog squad retired
Next Stories
1 ‘सामना’च्या आगीशी खेळू नका, शिवसेनेचा मुख्यमंत्र्यांना इशारा
2 रिझव्‍‌र्ह बँक आणि सरकार संघर्ष विकोपाला
3 यंदा उत्सवांमध्ये पारंपरिक वाद्यांचा दणदणाट
Just Now!
X