25 February 2021

News Flash

मुंबई: ४० हजाराची सोनसाखळी चोरली, तिने चोराला पकडण्यासाठी धावत्या बसमधून मारली उडी

काहीतरी घडल्याचं संजनाच्या लक्षात आलं....

(संग्रहित छायाचित्र)

चोराला पकडण्यासाठी एका मुलीने धावत्या बेस्ट बसमधून उडी मारली व गस्तीवर असणाऱ्या पोलिसांच्या मदतीने त्या सोनसाखळी चोराला पकडले. गुरुवारी अंधेरी चकाला येथे ही घटना घडली. या सोन्याच्या चेनची किंमत ४० हजार रुपये आहे. ऑटोरिक्षामध्ये बसून हा चोर पळण्याच्या प्रयत्नात असताना त्याला पोलिसांनी पकडले. गर्दीने खच्चून भरलेल्या डबल डेकर बसमधून कोणीतरी आपल्या गळयातील सोन्याची चेन चोरल्याचे लक्षात आल्यानंतर संजना बागुल (१९) ही तरुणी लगेच सर्तक झाली.

अंधेरी-कुर्ला रोडवर चकाला येथे एका वळणावर आरोपी मुकेश गायकवाड (३४) बसमधून उडी मारत असल्याचे संजनाने पाहिले. एका खासगी कंपनीत संजना टेलिकॉलर म्हणून नोकरी करते. या मार्गावर ती नेहमी ३३२ नंबर बसने प्रवास करते. “सिग्नलच्या पुढे गेल्यानंतर बसची गती थोडी धीमी झाली. आरोपी माझी चेन घेऊन पळत असल्याचे लक्षात आल्यानंतर मी सुद्धा बसमधून उडी मारण्याचे धाडस केले. मी मेहनतीच्या पैशातून ती चेन बनवली होती” असे संजनाने सांगितले. टाइम्स ऑफ इंडियाने हे वृत्त दिले आहे.

शुक्रवारी सकाळी पावणेदहाच्या सुमारास बसमध्ये भरपूर गर्दी होती. आरोपी मुकेश गायकवाड संजना बागुल यांच्यामागेच उभा होता. त्याचवेळी गर्दीचा फायदा घेत मुकेश गायकवाडने चेन चोरली. काहीतरी घडल्याचं संजनाच्या लक्षात आलं. तिने तिच्या गळयाला हात लावला, त्यावेळी चेन गायब होती. तिने मागे पाहिले, तर आरोपीने धावत्या बसमधून उडी मारली होती. तिने सुद्धा बसमधून उडी मारली व त्याचा पाठलाग केला. “आरडाओरडा करुन तिने अन्य लोकांना सर्तक केले. त्यावेळी चकाला येथे डयुटीवर असणाऱ्या वाहतूक पोलीस कॉन्स्टेबलने गायकवाडचा पाठलाग केला व रिक्षातून त्याला पकडले” अशी माहिती अंधेरी पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्याने दिली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 2, 2020 3:16 pm

Web Title: mumbai her chain stolen teen jumps off moving bus to nab thief dmp 82
Next Stories
1 उपमुख्यमंत्री अजित पवार करोनामुक्त; रुग्णालयातून मिळाला डिस्चार्ज
2 ११ वी प्रवेश प्रक्रियेच्या मुद्द्यावर विद्यार्थी-पालकांनी घेतली राज ठाकरेंची भेट
3 २४४ ठिकाणी आजपासून मोफत करोना चाचणी
Just Now!
X