News Flash

सण, उत्सवादरम्यान रस्त्यावर एकही बेकायदा मंडप उभारू देऊ नका: मुंबई हायकोर्ट

रस्त्यावर जर बेकायदा मंडप उभारला तर न्यायालयाचा अवमान केल्याप्रकरणी कारवाई करण्यात येईल, असा इशाराही न्यायालयाने दिला.

सण, उत्सवादरम्यान रस्त्यावर एकही बेकायदा मंडप उभारू देऊ नका: मुंबई हायकोर्ट
मुंबई हायकोर्ट

सण, उत्सवांदरम्यान रस्त्यावर एकही बेकायदा मंडप उभारू देऊ नका, असा महत्वपूर्ण निर्देश मुंबई उच्च न्यायालयाने राज्य सरकार आणि महापालिका प्रशासनाला दिले आहेत. अनेक ठिकाणी वाहतुकीला अडथळा येईल अशा पद्धतीने मंडप उभारले जातात. त्यामुळे रूग्णवाहिका किंवा अत्यावश्यक वेळी याचा वाहतुकीला अडथळा निर्माण होतो, असे मत न्यायालयाने नोंदवले. रस्त्यावर जर बेकायदा मंडप उभारला तर न्यायालयाचा अवमान केल्याप्रकरणी कारवाई करण्यात येईल, असा इशाराही न्यायालयाने दिला.

गणेशोत्सवासह इतर सण आणि उत्सवादरम्यान रस्त्यावर मंडप उभारले जातात. याप्रकरणी दाखल करण्यात आलेल्या एका याचिकेवर न्यायालयाने राज्य सरकार आणि मनपा प्रशासनाला तंबी दिली. अशा प्रकरणात किमान मुंबई, नवी मुंबई, ठाणे आणि पुण्यासारख्या मोठ्या महापालिकांमध्ये बेकायदा मंडप उभारण्यास देऊ नये, असे न्यायालयाने म्हटले. न्यायालयाचा आदेश मोडल्यास संबंधितांनी न्यायालयाचा अवमान केल्याचे समजले जाईल, असेही न्यायालयाने म्हटले. यापूर्वीही न्यायालयाने याप्रकरणी आपली नाराजी व्यक्त केली होती.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 7, 2018 4:47 pm

Web Title: mumbai high court bombay high court strict on illegal mandap pendols
Next Stories
1 महात्मा फुले, सावित्रीबाई फुलेंना भारतरत्न द्या, राज्य सरकारची केंद्राकडे शिफारस
2 दादर लोकलमध्ये सापडलं ९ एमएमच जिवंत काडतूस
3 ९ ऑगस्टला नवी मुंबईत आंदोलन नाही, मराठा आंदोलकांचा निर्णय
Just Now!
X