31 May 2020

News Flash

उपमहानिरीक्षक सुनील पारसकर दोषमुक्त

मे महिन्यात पोलिसांनी पारसकर यांच्यावर ७२४ पानांचे आरोपपत्र दाखल करण्यात आले होते.

मॉडेलवरील बलात्कार प्रकरण

मॉडेलचा विनयभंग तसेच तिच्यावर बलात्कार केल्याच्या आरोपातून निलंबित पोलीस उपमहानिरीक्षक सुनील पारसकर यांना दिंडोशी सत्र न्यायालयाने शुक्रवारी दोषमुक्त केले.
मे महिन्यात पोलिसांनी पारसकर यांच्यावर ७२४ पानांचे आरोपपत्र दाखल करण्यात आले होते. त्यानंतर पारसकर यांनी आरोपांतून दोषमुक्त करण्याची मागणी दिंडोशी न्यायालयाकडे केली होती. शुक्रवारी अतिरिक्त सत्र न्यायाधीश व्ही. के. राऊत यांनी त्यांची ही मागणी मान्य करत त्यांना दोषमुक्त केले. दुसरीकडे या निर्णयाला उच्च न्यायालयात आव्हान देणार असल्याची माहिती विशेष सरकारी वकील प्रदीप घरत यांनी दिली.
पारसकर यांनी २०१३ मध्ये आपला विनयभंग केला होता व दोनवेळा लैंगिक अत्याचार केले होते, असा आरोप करत या मॉडेलने पारसकर यांच्या विरोधात पोलिसांत तक्रार केली होती. त्यानंतर जुलै २०१४ मध्ये पोलिसांनी पारसकर यांच्यावर विनयभंग आणि बलात्कार केल्याचा गुन्हा दाखल केला होता. २०१२ मध्ये अतिरिक्त पोलीस आयुक्त म्हणून पारसकर कार्यरत असताना त्यांच्याशी आपली भेट झाल्याचा दावा या मॉडेलने आपल्या तक्रारीत केला. तर या मॉडेलसोबत पारसकर यांनी स्वत:च्या कार्यालयीन कार्यक्षेत्राबाहेर प्रवास केला होता. तसेच वरिष्ठांच्या परवानगीशिवाय तिच्याकडून महागडय़ा वस्तूही स्वीकारल्या होत्या. शिवाय दोघेही सतत संपर्कात होते, असा आरोप पोलिसांनी पारसकरांवर ठेवला होता.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 5, 2015 4:45 am

Web Title: mumbai high court give clean cheat to sunil paraskar
टॅग Sunil Paraskar
Next Stories
1 एमआयडीसीच्या अधिकाऱ्यांवरही कारवाई? दिघा बेकायदा बांधकामांप्रकरणी उच्च न्यायालयाचे संकेत
2 आमदारकीसाठी राणे यांची धावपळ
3 मुंबईतील टोल रद्द का केला जात नाही ?
Just Now!
X