News Flash

मुंबई उच्च न्यायालयातील सुनावणी प्रत्यक्ष आणि ऑनलाईन पद्धतीने

केवळ तातडीच्या याचिकांवर सुनावणी

(संग्रहित छायाचित्र)

करोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर मुंबई उच्च न्यायालयाचे कामकाज बुधवारपासून प्रत्यक्ष आणि ऑनलाइन अशा दोन्ही पद्धतीने चालवण्यात येणार आहे.

मुख्य न्यायमूर्तीं दीपांकर दत्ता यांच्या अध्यक्षतेखालील उच्च न्यायालयाची प्रशासकीय समिती आणि वकिलांच्या संघटनेची सोमवारी तातडीची बैठक झाली. या बैठकीत वाढत्या करोनाच्या पाश्र्वाभूमीवर न्यायालयातील गर्दी कमी करण्याच्या दृष्टीने फौजदारी प्रकरणे प्रत्यक्ष पद्धतीने, तर दिवाणी प्रकरणे ऑनलाइन पद्धतीने चालवली जातील. तर मुख्य न्यायमूर्तींच्या न्यायदालनाचे कामकाज प्रत्यक्ष आणि ऑनलाइन अशा दोन्ही पद्धतीने चालवले जाईल, असा निर्णय या बैठकीत घेण्यात आला.  याशिवाय केवळ तातडीच्या याचिकांवर सुनावणी घेतली जाईल, असेही या बैठकीत ठरवण्यात आले. खासगी कार्यालये बंद ठेवण्याच्या आणि जमावबंदीच्या पाश्र्वाभूमीवर वकील व न्यायालयीने कर्मचाऱ्यांना मुभा देण्याबाबत महाधिवक्ता आशुतोष कुंभकोणी यांनी बैठकीत सांगितले.   दरम्यान, काही न्यायमूर्तींनी कामकाज पूर्णपणे ऑनलाईन पद्धतीने वा प्रत्यक्ष व दोन्ही पद्धतीने चालवण्यास सुरुवात केली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 6, 2021 1:01 am

Web Title: mumbai high court hearings live and online abn 97
Next Stories
1 दाट वस्त्यांत निर्बंधांची ऐशीतैशी
2 अनिल देशमुख पायउतार
3 महिनाभरात दोन मंत्र्यांचे राजीनामे
Just Now!
X