News Flash

२७ गावांबाबत ७ मार्चपर्यंत निर्णय घेण्याचे आदेश

सरकार या २७ गावांबाबत काय भूमिका घेणार, याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.

कल्याण-डोंबिवली महापालिका

कल्याण-डोंबिवली पालिकेतील २७ गावे पालिकेत ठेवायची की वगळायची याचा अंतिम निर्णय ७ मार्चपर्यंत घ्या, असे मुंबई उच्च न्यायालयाने मंगळवारी राज्य सरकारला बजावले. त्यामुळे सरकार या २७ गावांबाबत काय भूमिका घेणार, याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.

ऑक्टोबर २०१५ साली कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या निवडणुका झाल्या. या निवडणुका होण्याआधी ही २७ गावे पालिकेत समाविष्ट करण्यात आली. त्यानंतर राज्यातील सत्ता परिवर्तन झाले आणि ७ सप्टेंबर २०१५ रोजी ही २७ गावे पुन्हा ‘कडोंमपा’तून वगळण्यात आली. पुन्हा निवडणूक आयोगाच्या दणक्यानंतर पालिकेसह २७ गावांच्या निवडणुका झाल्या. या वेळी या २७ गावांतून २१ नगरसेवक निवडणूक आले. पण पालिकेत समाविष्ट करण्यात आल्यापासून कोणतीच कामे होत नाहीत. ही गावे पालिकेतून वगळली जातील अशी भीती सर्वाना आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 24, 2016 3:52 am

Web Title: mumbai high court on 27 village issue in kalyan dombivli
टॅग : Kalyan Dombivli
Next Stories
1 राज्याचा अर्थसंकल्प १८ मार्चला
2 इंग्रजीच्या ‘सेवे’साठी मराठी ‘सदना’बाहेर
3 पूर्व द्रुतगती मार्गावर सोनसाखळी चोऱ्यांमध्ये वाढ
Just Now!
X