News Flash

बेकायदा बांधकामांचा तपशील सादर करा

ठाणे जिल्ह्य़ातील बांधकामे नियमित करण्यासाठी ‘ठाणे बंद’ करणाऱ्या राजकीय पक्षांना चपराक लगावत मुंबई उच्च न्यायालयाने ठाणे जिल्ह्य़ातील अनधिकृत बांधकामांचा तपशील सादर करण्याचे आदेश गुरुवारी दिले.

| April 19, 2013 03:02 am

ठाणे जिल्ह्य़ातील बांधकामे नियमित करण्यासाठी ‘ठाणे बंद’ करणाऱ्या राजकीय पक्षांना चपराक लगावत मुंबई उच्च न्यायालयाने ठाणे जिल्ह्य़ातील अनधिकृत बांधकामांचा तपशील सादर करण्याचे आदेश गुरुवारी दिले. गेल्या दोन वर्षांत किती अनधिकृत बांधकामे करणाऱ्यांना नोटीस बजावून कितींवर कारवाई करण्यात आली, याची माहितीही न्यायालयाने मागवली आहे.
हरित वसई संरक्षण समितीने वसई-विरारमधील अनधिकृत बांधकामांबाबत २००७ मध्ये याचिका केली होती. याशिवाय ठाणे, नवी मुंबई, कल्याण-डोंबिवली, मीरा-भाईंदर या परिसरातील अनधिकृत बांधकामांविरोधातही स्वतंत्रपणे याचिका करण्यात आल्या आहेत. २०१० मध्ये या याचिकांवर झालेल्या सुनावणीच्या वेळी ठाणे जिल्ह्य़ातील अनधिकृत बांधकामांची आणि त्यांच्यावर करण्यात आलेल्या कारवाईची माहिती देण्यात आली होती, परंतु त्यानंतर दोन वर्षांनी गुरुवारी न्यायमूर्ती धनंजय चंद्रचूड आणि न्यायमूर्ती अमजद सय्यद यांच्या खंडपीठासमोर या याचिकांवर सुनावणी झाली. याचिकेवरील सुनावणीच्या या दोन वर्षांच्या अंतराची न्यायालयाचे स्वत:हून दखल ठाणे जिल्ह्य़ातील अनधिकृत बांधकामांची सद्य:स्थिती नेमकी काय हे जाणून घेणे गरजेचे असल्याचे म्हटले. तसेच ठाणे जिल्हा परिषद, सिडको, एमएमआरडीए आणि एमआयडीसीला अनधिकृत बांधकामांच्या सद्य:स्थितीबाबत प्रतिज्ञापत्र सादर करून तपशील सादर करण्याचे आदेश दिले. एवढेच नव्हे, तर गेल्या दोन वर्षांत नेमकी काय कारवाई केली, याचाही तपशील देण्याचे स्पष्ट केले. याचिकादारांच्या वतीने अ‍ॅड्. उदय वारुंजीकर यांनी मुंब्रा येथील दुर्घटनेची माहिती न्यायालयाला देत ठाणे जिल्ह्य़ातील बेकायदा बांधकामे अधिकृत करण्याच्या मागणीसाठी राजकीय पक्षानी एकत्र येऊन ‘ठाणे बंद’ पुकारल्याची माहिती या वेळी न्यायालयाला दिली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 19, 2013 3:02 am

Web Title: mumbai high court orders to submit detail of illegal construction
Next Stories
1 अवैध बांधकामांवर मुख्यमंत्र्यांचा ‘क्लस्टर डेव्हलपमेंट’ चा उतारा
2 आमदारांचे निलंबन कायम
3 सुखदा-शुभदा प्रकरण राजकीय नेत्यांना भोवणार : अजित पवार, पतंगराव कदम, गोपीनाथ मुंडे आदींना पालिकेची नोटीस
Just Now!
X