News Flash

मुंबईतील पवई तलावात हाऊस बोटींना बंदी, महापालिकेचा निर्णय

संभाव्य दुर्घटना टाळण्यासाठी महापालिकेचा निर्णय

मुंबईतील पवई तलावात हाऊस बोटींना बंदी घालण्यात आली आहे.

बोट दुर्घटनेनंतर मुंबईतील पवई तलावात हाऊस बोटींना बंदी घालण्यात आली आहे. अशा प्रकारच्या दुर्घटना टाळण्यासाठी मुंबई महापालिकेने हा निर्णय घेतल्याचे सांगण्यात येत आहे. महापालिकेने घेतलेल्या या निर्णयामुळे अवैधपणे सुरू असलेल्या नौकाविहारालाही आळा बसेल, असे मानले जात आहे.

पवई तलावात गेल्या आठवड्यात बोट उलटून तीन जणांचा मृत्यू झाला होता. या तलावात महाराष्ट्र राज्य एन्जिलग असोसिएशनद्वारे अधिकृतरित्या मासेमारी आणि मत्स्यशेती करण्यात येते. तलावात बोट घेऊन जाताना संस्थेच्या नोंदणी वहीत नोंद केली जाते. पण गेल्या आठवड्यात आठ जणांना तलावात घेऊन गेलेल्या बोटीची कोणत्याही प्रकारची नोंदणी वहीत करण्यात आली नव्हती. तसेच बोटीतील तरुण हे संस्थेचे सदस्यही नसल्याचे उघड झाले होते. त्यामुळे कोणत्याही परवानगीशिवाय तलावात प्रवेश करण्याची परवानगी दिली कोणी, असा प्रश्न उपस्थित करण्यात येत होता. अपघातग्रस्त बोट ही संस्थेच्या सदस्याची असल्याचे उघड झाले होते.

या घटनेनंतर सुरक्षेच्या कारणास्तव पवई तलावात हाऊस बोटींना बंदी घालण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. महापालिकेच्या या निर्णयामुळे गेल्या काही दिवसांपासून पवई तलावात होत असलेली अवैध मासेमारी आणि बेकायदेशीर नौकाविहाराला आळा बसू शकेल, असे सांगितले जाते.

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 28, 2016 4:51 pm

Web Title: mumbai house boating ban in powai lake
Next Stories
1 रोह्याजवळ मालगाडीचा एक डबा घसरला, कोकण रेल्वे वाहतुकीवर परिणाम
2 गोरेगाव येथील हब मॉलच्या दुसऱ्या मजल्यावर आग
3 पश्चिम रेल्वेची वाहतूक विस्कळीत; लोकल १५ ते २० मिनिटाने उशिराने
Just Now!
X