मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यात १५ जूनपर्यंत लॉकडाउन वाढवण्याची घोषणा केली आहे. या कालावधीत ज्या जिल्ह्यात करोनाचा प्रादुर्भाव कमी आहे त्या जिल्ह्यात काही बाबींमध्ये सूट देण्यात आली आहे. पॉझिटीव्हीटी दर १० टक्क्यांपेक्षा कमी असलेल्या जिल्हे आणि पालिकांसाठी निर्बंध शिथिल करण्यात आले आहेत. तर २० टक्क्यांपेक्षा अधिक पॉझिटीव्हीटी दर असलेल्या जिल्ह्यात निर्बंध वाढवण्यात आले आहेत. मुंबई महानगरपालिका क्षेत्रात रुग्णसंख्येत घट झाल्याने काही निर्बंध शिथिल करण्यात आले आहे.

  • अत्यावश्यक दुकानं सकाळी ७ ते दुपारी २ वाजेपर्यंत सुरु राहतील
  • आवश्यकतेनुसार दुकाने सोमवार ते शुक्रवारी सकाळी ७ ते दुपारी २ पर्यंत सम-विषम पद्धतीने सुरु राहतील. रस्त्याच्या उजव्या बाजूची दुकानं सोमवार, बुधवार आणि शुक्रवारी खुली राहतील. तर डाव्या बाजूची दुकानं मंगळवार, गुरुवार सुरु राहतील. हीच पद्धत पुढच्या आठवड्यात लागू असेल. शनिवार रविवार दुकानं बंद असतील.
  • ई कॉमर्स अंतर्गत अत्यावश्यक वस्तूंबरोबर आवश्यकतेतर वस्तूंचे वितरण करण्यास परवानगी असेल
  • व्यापारी आस्थापनांना सोशल डिस्टन्सिंग, मास्कचा वापर आणि इतर उपाययोजना अनिवार्य राहतील
  • ‘ब्रेक द चेन’बाबतची नियमावली नवा आदेश येईपर्यंत लागू असेल

पुणे शहरात उद्यापासून सकाळी ७ ते दुपारी २ पर्यंत सर्व दुकाने सुरू राहणार!

लॉकडाउनचे निर्बंध १५ जूनपर्यंत कायम राहणार असल्याची घोषणा केल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मुंबईत होणारी गर्दी पाहून आश्चर्य व्यक्त केलं आहे. इतकंच नाही तर मुंबईत अशीच गर्दी होत राहिली तर आणखी कडक निर्बंध करणार असल्याचा इशाराच उद्धव ठाकरेंनी दिला आहे. मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणच्या मल्टीप्लीस्टिज पुस्तकाच्या प्रकाशनानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.

साताऱ्यात नवा विक्रम…! एका दिवसात ३९.६७१ किलोमीटरचा रस्ता तयार

मुंबईत रुग्णसंख्येत घट

मुंबईत करोना रुग्णांची संख्या गेल्या काही दिवसात कमी होत चालली आहे. त्यामुळे मुंबईकरांना थोडा दिलासा मिळाला आहे. मात्र करोना संपला नसल्याची जाणीव असल्याने लॉकडाउन लावण्यात आला आहे. मुंबईत करोना रुग्ण बरे होण्याचं प्रमाण ९४ टक्के आहे. रुग्ण दुप्पटीचा वेग हा ४३३ दिवसांवर पोहोचला आहे. २४ मे ते ३० मे दरम्यान रुग्णवाढीचा दर हा ०.१५ टक्के इतका होता. सध्या मुंबईत सक्रीय रुग्णांची संख्या २२ हजार ३९० इतकी आहे.