30 November 2020

News Flash

नितीन नांदगावकरांच्या इशाऱ्यानंतर ‘कराची स्वीट्स’ व्यवस्थापनाने उचललं ‘हे’ पाऊल

कराची स्वीट्स मुद्द्यावरून शिवसेनेत मतभेद

मुंबईतील वांद्रे भागात असलेल्या कराची स्वीट्सचं नाव बदला अशी मागणी शिवसेना नेते नितीन नांदगावकर यांनी केली. कराची स्वीट्स या नावातील कराची या शब्दाला नितीन नांदगावकर यांनी आक्षेप घेतला असून १५ दिवसांच्या आत हे नाव बदलण्यात यावं किंवा त्यातील कराची हा शब्द काढून टाकावा अशी मागणी नितीन नांदगावकर यांनी केली. तसेच, मुंबईतील कराची बेकरीच्या सगळ्याच आऊटलेट्सना त्यांनी धमकीवजा इशारा दिला. या इशाऱ्यानंतर शुक्रवारी सकाळी ग्राहकांना कराची स्वीट्सच्या दुकानावर एक विचित्र गोष्ट पाहायला मिळाली. शिवसेना नेत्याच्या इशाऱ्यानंतर हे नाव वृत्तपत्राच्या पानांनी झाकून टाकण्यात आले आहे.

फोटो सौजन्य- सोशल मीडिया

कराची स्वीट्स संपूर्ण देशात पसरलेली फूड चेन आहे. साधरणपणे प्रमुख शहरं आणि महानगरं यामध्ये कराची स्वीट्सची उत्पादनं विकणारे अनेक आऊटलेट्स आहेत. मुंबईतही अनेक ठिकाणी कराची बेकरीचे आऊटलेट्स आहेत. या बेकरीच्या नावातील कराची या शब्दाला नितीन नांदगावकर यांनी आक्षेप घेतला आहे. मुंबईतील सर्व कराची बेकरीच्या आऊटलेट्सना त्यांनी इशारादेखील दिला आहे. कराची बेकरीचं नाव बदलून मालकांनी स्वत:च नाव किंवा दुसरं कोणतंही नाव ठेवावं, पण कराची हा शब्द नावातून काढून टाकावा, अशी मागणी त्यांनी केली. त्यानंतर तात्पुरता उपाय म्हणून कराची स्वीट्स व्यवस्थापनाने मुंबईतील वांद्रे परिसरात असलेल्या आपल्या दुकानाच्या नावावर थेट वृत्तपत्राचे कागद चिकटवून नाव झाकून टाकले.

फोटो सौजन्य- सोशल मीडिया

आणखी वाचा- कराची बेकरीच्या नावावरुन शिवसेनेत दोन भूमिका, संजय राऊत म्हणतात नाव बदलणं अयोग्य

दरम्यान, या मुद्द्यावर शिवसेनेत मात्र दुमत असल्याचं दिसून आलं आहे. शिवसेना नेते संजय राऊत यांनी नितीन नांदगावकरांच्या भूमिकेला विरोध केला आहे. आता अशा प्रकारची मागणी करण्यात काहीच अर्थ नाही. नितीन नांदगावकर यांची भूमिका ही शिवसेनेची अधिकृत भूमिका नाही, असे राऊत यांनी स्पष्ट केलं आहे. त्यामुळे या मुद्यावर शिवसेनेतच मतभिन्नता असल्याचं उघड आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 20, 2020 12:16 pm

Web Title: mumbai karachi sweets shop in bandra owner covered name with newspaper after shiv sena leader nitin nandgaokar demand to change the name vjb 91
Next Stories
1 “भगवा तर तुम्ही तुमच्याच हातानं उतरवला, आता मुंबईकर करून दाखवतील”
2 …शिवसेनेला जनता पाताळात गाडेल, २०२२ मध्ये त्याची सुरुवात होणार – भातखळकर
3 “पालिकेवरून भगवा उतरवणं म्हणजे मुंबई भांडवलदारांच्या घशात घालून मराठी माणसाला गुलाम करण्यासारखे”
Just Now!
X