News Flash

प्रेयसीवर जीवघेणा हल्ला करून तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न

प्रियकरावर गुन्हा दाखल

प्रतिनिधिक छायाचित्र

बोरिवलीच्या नॅशनल पार्कमध्ये फिरायला आलेल्या प्रेयसी आणि प्रियकर यांच्यात  भांडण झाल्याने प्रियकराने प्रेयसीवर हल्ला केला. प्रियकराने आपल्या सोबत आणलेल्या चाकूने हल्ला केला. यामध्ये तरुणी गंभीर जखमी झाली आहे. त्यानंतर त्याने स्वतःवर वार करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. याप्रकरणी प्रियकरावर हत्येचा प्रयत्न आणि आत्महत्येचा प्रयत्न असा गुन्हा दाखल करण्यात  आला आहे. जखमी प्रेयसी आणि प्रियकर यांना  जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले.

प्रेयसी आणि प्रियकर हे नॅशनल पार्कमध्ये फिरायला आले होते. अचानक त्यांच्यात  भांडणे झाल्यानंतर प्रियकराने चाकूने हल्ला केला. त्यांच्यात नेमके कोणत्या कारणाने भांण झाले याचा खुलासा अद्याप झालेला नसल्याचे पोलिसांनी सांगितले. प्रेयसी अद्याप अत्यवस्थ आहे. पोलीस सूत्रांच्या म्हणण्यानुसार, तरुणाने भेटायला येतानाच सोबत चाकू आणल्याने हा पूर्वनियोजित कट असावा असा संशय पोलिसांना बळावला आहे. या प्रकरणी कस्तुरबा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला असून पोलीस अधिक तपास करीत आहेत. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 30, 2019 8:13 pm

Web Title: mumbai knife attack girlfriend borivali national park accused tried to commit suicide
Next Stories
1 आता पाण्यातही ‘उबर’, मुंबई ते आलिबाग करा जलद प्रवास
2 राज ठाकरेंना आघाडीत घेण्याबाबत सध्या कुठलीही चर्चा नाही : नवाब मलिक
3 सध्याचा लोकायुक्त कायदा जनतेची दिशाभूल करणारा; नवाब मलिक यांचा आरोप
Just Now!
X