विविध तांत्रिक कामांसाठी आज(दि.11) मध्य रेल्वेच्या कल्याण ते ठाणे दरम्यान अप जलद मार्गावरील नियोजित मेगाब्लॉक रद्द करण्यात आला आहे. मध्य रेल्वेच्या अधिकृत ट्विटर हँडलवरून याबाबत माहिती देण्यात आली आहे.  सकाळी ११.२० वाजेपासून दुपारी ३.५० वाजेपर्यंत ब्लॉक घेण्यात येणार होता पण तांत्रिक कारणांमुळे हा ब्लॉक रद्द करण्यात आल्याची माहिती मध्य रेल्वेकडून देण्यात आली आहे. मध्य रेल्वेच्या प्रवाशांना दिलासा मिळाला असला तरी हार्बर आणि पश्चिम मार्गावरील ब्लॉक ठरल्याप्रमाणेच घेतला जाणार आहे.

हार्बर मार्ग

कुठे – सीएसएमटी ते चुनाभट्टी आणि सीएसएमटी ते वांद्रे

कधी – अप मार्ग – स.११.१० ते दु. ३.४० आणि डाऊन मार्ग-स. ११.४० ते दु. ४.१० वा.

परिणाम – सीएसएमटी ते वाशी, सीएसएमटी-बेलापूर व सीएसएमटी ते पनवेल या मार्गावरील गाडय़ा बंद राहतील. त्यामुळे पनवेल ते कुर्ला दरम्यान विशेष उपनगरी रेल्वे फेऱ्या चालवण्यात येतील.  ब्लॉक काळात सकाळी १०.०० ते सायंकाळी ६.०० वाजेपर्यंत हार्बर मार्गावरील प्रवाशांना पश्चिम रेल्वे आणि मुख्य मार्गावर प्रवास करण्याची मुभा राहील.

पश्चिम रेल्वे

कुठे – सांताक्रूझ ते गोरेगाव दरम्यान अप व डाऊन धिमा मार्ग

कधी – स. १०.३५-दु.३.३५ वा.

परिणाम – अप व डाऊन धिम्या मार्गावरील गाडय़ा सांताक्रूझ ते गोरेगाव दरम्यान जलद मार्गावर धावणार आहेत. राम मंदिर स्थानकात  गाडय़ा थांबणार नाहीत. तसेच काही उपनगरीय गाडय़ा ब्लॉकदरम्यान रद्द करण्यात येतील.