News Flash

लोकल विलंबाने, रेल्वेच्या तीनही मार्गावर मेगाब्लॉक

काही लोकल रद्द करण्यात येणार असून काही लोकल विलंबाने धावणार

(संग्रहित छायाचित्र)

मुंबई लोकलच्या मध्य, हार्बर आणि पश्चिम या तीनही मार्गांवर आज (दि.23) विविध तांत्रिक कामांसाठी ब्लॉक घेण्यात येणार आहे. मध्य रेल्वेवर माटुंगा ते मुलुंड डाऊन जलद मार्ग, हार्बरवर सीएसएमटी ते चुनाभट्टी, वांद्रे दोन्ही मार्गावर आणि पश्चिम रेल्वेवरील बोरिवली ते गोरेगावदरम्यान दोन्ही जलद मार्गावर ब्लॉक असणार आहे. त्यामुळे लोकल फेऱ्या उशिराने धावतील. मध्य रेल्वे मार्गावर ब्लॉक काळात डाऊन जलद मार्गावरील लोकल डाऊन धीम्या मार्गावर वळवण्यात येतील. मुलुंड स्थानकातून पुन्हा डाऊन जलद मार्गावर या लोकल वळवण्यात येणार आहेत. परिणामी जलद मार्गावरील लोकल सुमारे २० मिनिटे विलंबाने धावणार आहेत. तर पश्चिम मार्गावर ब्लॉक काळात अप आणि डाऊन जलद मार्गावरील लोकल अप आणि डाऊन धीम्या मार्गावर वळवण्यात येतील. यामुळे काही लोकल रद्द करण्यात येणार असून काही लोकल विलंबाने धावणार आहेत.

मध्य रेल्वे

कुठे-माटुंगा ते मुलुंड डाऊन जलद मार्ग

कधी- रविवार. स.१०.३० ते दु.३.००

हार्बर मार्ग: कुठे- सीएसएमटी ते चुनाभट्टी, वांद्रे दोन्ही मार्गावर

कधी: रविवार. अप मार्ग-११.१० ते दु.३.४० वा. आणि डाऊन मार्ग-स.११.४० ते दु.४.१० वा.

पश्चिम रेल्वे: कुठे : बोरिवली ते गोरेगावदरम्यान दोन्ही जलद मार्ग कधी:  रविवार. स.१०.३५ ते दु.३.३५ वा.

 

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 23, 2019 7:47 am

Web Title: mumbai local mega block news sas 89
Next Stories
1 धारावी प्रकल्पासाठी ‘सेकलिंक’ आग्रही
2 पालिकेतर्फे होणारा सचिनचा सत्कार रद्द?
3 ‘व्हिवा लाऊंज’मध्ये अभिनेत्री इरावती हर्षे
Just Now!
X