विविध तांत्रिक कामांसाठी रविवारी(दि.18) मुंबई लोकलच्या तीनही मार्गावर ब्लॉक घेण्यात येणार आहे. यामुळे मध्य तसेच पश्चिम रेल्वे मार्गावरील उपनगरी रेल्वे १५ ते २० मिनिटे उशिराने धावतील.

मध्य रेल्वे

’ कुठे – माटुंगा ते मुलुंड

’ कधी – स.१०. ३० – दु. ३ वा.

’ परिणाम – छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस(सीएसएमटी) येथून स. ९.५३ ते दुपारी २.४३ दरम्यान ठाणे-कल्याणच्या दिशेने सुटणाऱ्या जलद, अर्ध जलद उपनगरी रेल्वे शीव ते मुलुंड दरम्यान धीम्या मार्गावर चालवल्या जातील  सकाळी १०.४६ ते दुपारी ३.१८ या वेळेत ठाण्याहून दादर-सीएसएमटीकडे येणाऱ्या जलद, अर्ध जलद रेल्वे नेहमीच्या थांब्यांव्यतिरिक्त मुलुंड, भांडुप, विक्रोळी याही स्थानकांवर थांबतील. तसेच सकाळी ११ ते संध्याकाळी ५ दरम्यान सीएसएमटीवरून सुटणाऱ्या सर्व धिम्या रेल्वे १५ मिनिटे उशिराने धावतील.

हार्बर रेल्वे

’ कुठे – कु र्ला ते वाशी  दरम्यान

’ कधी – सकाळी ११ ते दुपारी ३. ४०

’ परिणाम – स. १०.३४ ते दुपारी ३.१८ या वेळेत सीएसएमटीहून पनवेलकडे जाणारी तर सकाळी १०.२१ ते दुपारी ३ यावेळेत पनवेल, बेलापूर, वाशीहून सीएसएमटीकडे येणारी सर्व उपनगरी सेवा बंद असेल. ब्लॉक दरम्यान सीएसएमटी ते पनवेल मार्गावर विशेष फे ऱ्या चालवल्या जातील.  सकाळी १० ते संध्याकाळी ४. ३० वाजेपर्यंत हार्बर मार्गावरील प्रवाशांना मध्य आणि ट्रान्स हार्बर मार्गावर प्रवास करण्याची मुभा राहील.

पश्चिम रेल्वे

’ कुठे – चर्चगेट ते मुंबई सेंट्रल

’ कधी – शनिवारी मध्यरात्री १ ते रविवारी पहाटे ४.३० आणि रविवारी सकाळी १०.३५ ते दुपारी ३. ३५

’ परिणाम – शनिवारी आणि रविवारी  ११.५५ला विरारहून चर्चगेटसाठी सुटणारी रेल्वे मुंबई सेंट्रलपर्यंत धावेल. तेथून ती विरारसाठी रवाना होईल. बोरिवलीहून शनिवारी रात्री १२  आणि १२.३० वाजता सुटणारी रेल्वे मुंबई सेंट्रलपर्यंतच धावेल. या गाडय़ा पुन्हा सकाळी मुंबई सेंट्रलहून अनुक्रमे पहाटे ४.२५ आणि पहाटे ४. २९ यावेळेत विरार आणि बोरिवलीकडे रवाना होतील. विरारहून रात्री १२.५ ला सुटणारी गाडी मुंबई सेंट्रल पर्यंतच धावेल.