26 September 2020

News Flash

लोकल उशीराने, मध्य-हार्बरवर मेगाब्लॉक

पश्चिम मार्गावर ब्लॉक नाही

(संग्रहित छायाचित्र)

रेल्वे रुळ, सिग्लन यंत्रणेच्या देखभाल, डागडुजीसाठी मध्य रेल्वे मार्ग आणि हार्बर मार्गावर आज(दि.२९) रविवारी मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे. याशिवाय विक्रोळी स्थानकातील पादचारी पुलासाठी गर्डर उभारण्यासाठी शनिवार मध्य रात्रीपासून आज पहाटेपर्यंत विद्याविहार ते मुलुंड स्थानकांदरम्यान पॉवर ब्लॉक घेण्यात आला होता. याच वेळेत पश्चिम मार्गावरील वसई-विरार दरम्यान नाईट ब्लॉक घेण्यात आला होता. त्यामुळे दिवसाच्या वेळेत पश्चिम मार्गावर ब्लॉक घेण्यात आलेला नाही. ब्लॉक दरम्यान लोकल १० ते १५ मिनिटे उशीराने धावण्याची शक्यता आहे.

मध्य रेल्वे

कुठे : माटुंगा ते मुलुंड डाऊन धीमा मार्ग

कधी : स. ११.२० ते दु. ३.५०

परिणाम : स. ११ ते दु. ३.४५ दरम्यान डाऊन धीम्या मार्गावरील लोकल डाऊन जलद मार्गावरून धावतील. त्या विद्याविहार, कांजुर मार्ग आणि नाहूर स्थानकात थांबणार नाही. मुलुंड स्थानकानंतर त्या पुन्हा डाऊन धीम्या मार्गावर वळविण्यात येतील. ठाणे स्थानकातून सकाळी ११.२४ ते दुपारी ३.२६ या काळात मार्गस्थ होणाऱ्या अप जलद लोकल मुलुंड, भांडुप, विक्रोळी, घाटकोपर, कुर्ला स्थानकात थांबतील. तर सीएसएमटीहून १०.४९ ते दु. ३.२१ या काळात सुटणाऱ्या डाऊन जलद, अर्ध जलद लोकल घाटकोपर, विक्रोळी, मुलुंड, भांडुप आणि दिवा स्थानकात थांबतील.

हार्बर मार्ग

कुठे : सीएसएमटी ते चुनाभट्टी, वांद्रे अप आणि डाऊन मार्ग

कधी : स. ११ ते दु. ४.००

परिणाम : सीएसएमटी, वडाळा येथून स. ११.३४ ते दु. ४.२३ या काळात वाशी, बेलापूर, पनवेलसाठी तर स. ९.५६ ते दु. ४.१६ या काळात वांद्रे, गोरेगावसाठी सुटणाऱ्या लोकल रद्द असतील. पनवेल, बेलापूर, वाशी येथून स. ९.५३ ते दु. २.४४ या काळात सीएसएमटी, वडाळासाठी तर गोरेगाव, वांद्रे येथून स. १०.४५ ते सं. ४.५८ या काळात वडाळा, सीएसएमटीसाठी सुटणाऱ्या लोकल रद्द असतील. ब्लॉक काळात पनवेल ते कुर्ला दरम्यान विशेष लोकलसेवा सुरू असेल.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 29, 2019 9:09 am

Web Title: mumbai local mega block updates sas 89 9
Next Stories
1 युती सरकारच्या शेतकरी कर्जमाफीत गोंधळ 
2 औषधांअभावी ‘हिमोफिलिया’ रुग्णांचे हाल!
3 नव्या वर्षांत ‘लोकसत्ता’चा विचारश्रीमंत नजराणा
Just Now!
X