News Flash

लाज आणली! लोकलमध्ये तरूणांचे अश्लिल चाळे, व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल

व्हिडिओमध्ये दोन्ही तरूणांच्या चेहऱ्यावर कोणतेही हावभाव दिसत नाहीत. 

(संग्रहित छायाचित्र)

मुंबईतील लोकल ट्रेनमधील दोन विकृत मनोवृत्तीच्या तरुणांचा अश्लिल व्हिडीओ समोर आला आहे. गुरुवारी काही व्हॉट्सअॅप ग्रुपवर ही क्लिप व्हायरल झाली. या व्हिडीओमध्ये एक तरुण दुसऱ्या तरूणाबरोबर प्रवाशांसमोरच अश्लिल चाळे करत असल्याचे दिसत आहे. रेल्वेने हे प्रकरण गंभीरतेने घेत या प्रकरणाची चौकशी करणार आहे.

नवभारत टाईम्सच्या वृत्तानुसार हा व्हिडीओ मध्ये रेल्वे मार्गावरील आहे. २९ सेकंदाच्या या क्लिपमध्ये एका तरूणाने हेडफोन लावले असून तो मोबाईलमध्ये काहीतरी पाहत आहे. तर दुसरा तरूण त्याच्या प्रायव्हेट पार्टसोबत अश्लिल चाळे करत असल्याचे दिसतेय.

व्हिडिओमध्ये दोघांच्याही चेहऱ्यावर कोणतेही हावभाव दिसत नाहीत.  ते मोबाईलमध्ये काहीतरी पाहण्यात व्यस्त आहेत. यादरम्यानच लोकलमध्ये पुढील स्थानक भायखळा अशी घोषणा झाली. यावरून ही घटना चिंचपोकळी-भायखळा दरम्यानची आहे. मात्र ही घटना कधीची आहे हे अद्याप समोर आलेले नाही. मात्र, रेल्वे पोलिसांनी दोघांना अटक करण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. कायद्याच्या कचाट्यातून त्यांना कोणीही वाचवू शकणार नाही असे रेल्वे पोलिसांनी माध्यमांशी बोलताना सांगितले.

या घटनेच्या दोषींची ओळख पटवून योग्य ती कारवाई करण्यात येईल असे सीएसएमटी रेल्वे स्टेशनच्या जीआरपीचे वरिष्ठ पोलिस निरिक्षक हेमंत बावधंकर म्हणाले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 10, 2018 12:15 pm

Web Title: mumbai local sex video man apperingto pleasure another male commute in a packed local train
टॅग : Social Media
Next Stories
1 राम मंदिराआधी गणेशोत्सव मंडप बांधा, मनसेची शिवसेना भवनाबाहेर पोस्टरबाजी
2 मध्य रेल्वेवरील मोटरमन्सचा ओव्हरटाइम करण्यास नकार , ९ लोकलफेऱ्या रद्द
3 अल्पवयीन मुलींवर लैंगिक अत्याचार, मुंबईतील विकृत दाम्पत्याला अटक
Just Now!
X