आठवड्याच्या पहिल्याच दिवशी तिन्ही मार्गांवरील मुंबईकरांना आज (सोमवार) कामावर पोहचण्यासाठी पळापळ करावी लागत आहे. काल रात्री दिडच्या सुमारास बंद पडलेली पश्चिम मार्गावरील रेल्वे वाहतूक पूर्वपदावर येत नाही तेच आता मध्य मार्गावरील वाहतूक मंदावली आहे. मध्य रेल्वेच्या दिवा स्टेशनजवळ रेल्वे ट्रॅकवर ट्रक बंद पडल्याने मध्य रेल्वेची वाहतूक उशीराने सुरू आहे. या मार्गावरील लोकल अर्धा तास उशीराने धावत आहेत. मध्य मार्गावर सकाळी बाहेरगावाहून येणा-या गाड्या आणि उपनगरीय वाहतूक यांचे वेळापत्रक पार कोलमडून गेले आहे. पश्चिम ट्रान्स हार्बर मार्गावरही पेंटालून तुटल्याने वाहतुकीला अडचणी येत आहेत.
काल रात्री दिड वाजता बोरीवलीहून कांदिवली यार्डात जाताना लोकलचा डबा ट्रॅकवरून घसल्याने पश्चिम रेल्वे मार्गावरील वाहतूकीवर सकाळी मोठा परिणाम झाला होता. मात्र, सकाळी साडेनऊच्या सुमारास या मार्गावरील वाहतूक सुरळीत सुरू झाली.